Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशाल पाटील लोकसभेत बरसले, सांगलीच्या पूर समस्येबाबत सरकारकडे केली मोठी मागणी

विशाल पाटील लोकसभेत बरसले, सांगलीच्या पूर समस्येबाबत सरकारकडे केली मोठी मागणी 


सांगलीत मुसळधार पाऊस कोसळत असताना जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील लोकसभेत बरसले. सांगलीसह कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हीच भीती पहिल्यांदाच लोकसभेत पोहचलेल्या विशाल पाटील यांनी व्यक्त करत मोदी सरकारकडे मोठी मागणी केली.

लोकसभेत सांगलीच्या पूरस्थितीवर बोलताना विशाल पाटील यांनी कोयना तसेच अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीवरही नाराजी व्यक्त केली. या धरणांसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने केंद्रीय जल आयोगाच्या निकषांचे उल्लंघन केल्याचा दावा पाटील यांनी केला.

काय म्हणाले विशाल पाटील?
सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राचा अनेक भाग मागील अनेक वर्षांपासून पूरस्थितीचा सामना करत आहे. 2005, 2019 आणि 2021 मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती. सध्या अशीच स्थिती निर्माण होत असल्याची चिंता पाटील यांनी व्यक्त केली.

केंद्रीय जल आयोगाने कोयना आणि अलमट्टी धरणांतील पाणी पातळीबाबत निकष निश्चित केले आहेत. पण दोन्ही राज्यांत या निकषांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे यामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाटलांनी केली. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आयोगाच्या निकषांचे पालन व्हावे. त्याचे रिअल टायमिंग नियंत्रण व्हायला हवे. धरणांतून पाणी सोडण्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय हवा, यावर पाटील यांनी आपल्या भाषणात भर दिला.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आसाममधील पूरस्थितीबाबत बोलल्या. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुराबाबतही काहीतरी करावे. कारण पुरामुळे अनेकांचा जीव जात आहे, जनावरांचा मृत्यू होत असून संपत्तीचेही नुकसान होत असल्याचे विशाल पाटील यांनी सभागृहात सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.