Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कफ सिरप प्यायल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?

कफ सिरप प्यायल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?

पावसाळ्यात हवेतील वातावरण बदलामुळे सर्दी-खोकला अशा समस्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच होते. जास्तीत जास्त लोक खोकला दूर करण्यासाठी कफ सिरप पितात. पण कफ सिरप प्यायल्यानंतर जास्तीत जास्त लोक एक चूक करतात. ही चूक म्हणजे लोक कफ सिरप प्यायल्यानंतर पाणी पितात. पण कफ सिरपनंतर पाणी पिणं खरंच योग्य असतं अयोग्य? आज आपण हेच जाणून घेणार आहोत.

खोकला लगेच शांत करण्यासाठी लोक वेगवेगळे सिरप घेतात किंवा घरात काही सिरप तयार करतात. या सिरपने घशाला-छातील लगेच आराम मिळतो. खोकला लगेच दूर होतो. खोकला दूर करण्यासाठी सामान्यपणे मध, ग्लिसरीन आणि काही झाडांचा अर्क जसे की, तुळशी, पुदीना, आलं यांचा वापर केला जातो. या गोष्टींनी घशाला लगेच आराम मिळतो आणि खोकला शांत होतो.

कफ सिरप जरा घट्ट तयार केलं जातं. जे शरीरात जाऊन आरामात आपलं काम करतं. पण त्यावर जर पाणी प्याल तर त्याचा प्रभाव कमी होतो. हे सिरप सेवन केल्यावर घशात एक सुरक्षा कवच तयार होतं. ज्यामुळे घशाला उष्णता मिळते आणि आराम मिळतो. अशात एक्सपर्ट सांगतात की, कफ सिरप प्यायल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नये. कारण याने सिरपचा प्रभाव कमी होतो. याने काहीच फायदा मिळत नाही.

नॅचरल पद्धतीने तयार केलेलं कफ सिरप श्वास नलिकेत अडकून पडलेला कफ पातळ करून मोकळा करतं. तसेच घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होतो. तसेच इन्फेक्शनपासून बचाव होतो आणि घशातील खवखवही दूर होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.