Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शहीद कॅप्टनच्या वडिलांचा स्मृतीला प्रस्ताव, 'हवं तर माझ्या लहान मुलाशी लग्न कर..'

शहीद कॅप्टनच्या वडिलांचा स्मृतीला प्रस्ताव, 'हवं तर माझ्या लहान मुलाशी लग्न कर..' 

नवी दिल्ली : मीडियाशी बोलताना शहीद कॅप्टन अंशुमनचे वडील रवी प्रताप यांनी सांगितलं की, ते त्यांच्या लहान मुलाचं स्मृतीसोबत लग्न लावण्यास तयार आहेत. स्मृती यांना अंशुमनच्या आठवणी घेऊन या घरात राहायचं असेल तर ती राहू शकते, असं ते म्हणाले. शहीद कॅप्टनच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांचा लहान मुलगा स्मृतीपेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे. स्मृती या घरासाठी मुलगी आणि सून दोन्ही आहे. तिने धाकट्या मुलाशी लग्न केलं, तर ते तिला मुलीप्रमाणे ठेवतील.

रवी प्रताप यांनी सांगितलं की, ते त्यांच्या सुनेशी लग्नाबद्दल बोलले तेव्हा स्मृती म्हणाली की ती फक्त 26 वर्षांची आहे. तिचं संपूर्ण आयुष्य अजून बाकी आहे. शहीद कॅप्टन अंशुमन यांना कीर्ती चक्र प्रदान करण्यात आल्यापासून त्यांच्या आई-वडिलांनी सून स्मृती यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. सून घरातून खूप दिवसांआधीच निघून गेली, असेही ते म्हणाले. तिने स्वतःला सावरण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र अनेक दिवस होऊनही ती घरी परतलीच नाही आणि तिने काही सांगितलंही नाही.

कॅप्टनच्या वडिलांनीही सांगितलं, की जर तिने धाकट्या मुलाशी लग्न केलं आणि त्यांना दोघांना बाळ झालं तर ते हे मूल स्मृतीकडे सोपवतील. त्या मुलाच्या वडिलांच्या कॉलममध्ये अंशुमनचं नाव लिहिलं जाईल. जो काही वारसा असेल तो आम्ही या मुलाला देऊ. स्मृतीची जी इच्छा असेल, ती आम्ही स्वीकारू, असंही त्यांच्या वडिलांनी सांगितलं.

राष्ट्रपती भवनात गेल्यावर शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या घराचा पत्ता बदलण्यात आला होता, असा आरोप कॅप्टनच्या वडिलांनी केला आहे. यालाही आपला आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले. रवी प्रताप म्हणाले की, मला कीर्ती चक्राला चक्र माझ्या हातात घ्यायचं होतं आणि कवटाळायचं होतं. पण मला स्पर्शही करू दिला नाही. माझी ओळख काढून घेतली गेली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.