Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वरळी स्पामध्ये मारल्या गेलेल्या गुरू वाघमारेने दोन्ही पायावर कोरली होती शत्रूंची नावे

वरळी स्पामध्ये मारल्या गेलेल्या गुरू वाघमारेने दोन्ही पायावर कोरली होती शत्रूंची नावे

स्पा मध्ये मालकाने केली होती हत्या वरळीत 'सॉफ्ट टच स्पा' मध्ये हत्या करण्यात आलेल्या पोलीस खबरी गुरूसिद्धप्पा वाघमारे याने आपल्या जीवनात अनेक शत्रू पाळून ठेवले होते, हे शत्रू कुठल्याही क्षणी आपला घात करतील म्हणून गुरूसिद्धप्पाने आपल्या दोन्ही पायांच्या मांडीवर २२ शत्रूच्या नावांच्या यादी टॅटू रुपात कोरून ठेवली होती.

या यादीत अटक करण्यात आलेला 'स्वाफ्ट टच स्पा'चा मालक संतोष शेरेगर याचे देखील नाव कोरले होते. दरम्यान पोलिसांना गुरूच्या घरी तपासणी केली असता त्यात एक लाल रंगाची डायरी मिळून आली त्यात विविध स्पा मालकाकडून वसूल केलेल्या हप्त्याचा लेखाजोखा मांडला होता. वरळी पोलिसांनी या हत्येप्रकरणी संतोष शेरेगर याला अटक केली असून गुन्हे शाखेने नालासोपारा आणि राजस्थान मधील कोटा येथून तिघांना ताब्यात घेतले आहे.

आरटीआय कार्यकर्ता तसेच पोलीस खबरी असणारा गुरूसिद्धपा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची वरळीच्या सॉफ्ट टच स्पा मध्ये गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे बुधवारी दुपारी उघडकीस आले. वरळी पोलिसांनी गुरूसिद्धपा याचा मृतदेह ताब्यात घेऊन नायर रुग्णालयात पूर्व चाचणी साठी पाठवला होता, तसेच स्पा मध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणी आणि स्पा चा मालक संतोष शेरेगर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. गुरूसिद्धपा वाघमारे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना डॉक्टरांना त्याच्या दोन्ही पायांच्या मांडीवर काही नावे टॅटू रुपात कोरल्याचे आढळून आले.

डॉक्टरांनी याबाबत वरळी पोलिसांना कळवले असता पोलिसांनी तात्काळ शवविच्छेदन विभागात धाव घेतली, त्यावेळी पोलिसांनी इन्कवेस्ट पंचनामा सुरू केला. गुरुसिद्धपा याच्या दोन्ही पायाच्या मांड्यावर २२ नावाची यादी कोरली होती, तसेच एक संदेश देखील होता. 'माझ्या दुष्मनाचे नावे डायरीत आहे, चौकशी करून कारवाई करा, असे लिहून खाली २२जणांची नावे कोरण्यात आली होती, त्यात सॉफ्ट टच स्पा चा मालक संतोष शेरेगर याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.

दरम्यान पोलिसांनी गुरूच्या घराची तपासणी केली असता त्यांना लाल रंगाची डायरी मिळून आली, त्या डायरीत गुरूने विविध स्पा मालकाकडून हप्ता वसूल केल्याचा लेखाजोखा मांडला होता.तसेच लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाच्या पेनाचा वापर करून लाल रंगाच्या पेनाने आजचा दिवस वाईट गेला, तर हिरव्या रंगाच्या पेनाने आजचा दिवस चांगला गेला आणि निळ्या रंगाच्या पेनाने आजचा दिवस नॉर्मल गेला असे लिहून ठेवले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.