Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वरळी हिट अँड रन प्रकरणात शिंदे गटाचा उपनेता पोलीसांच्या ताब्यात

वरळी हिट अँड रन प्रकरणात शिंदे गटाचा उपनेता पोलीसांच्या ताब्यात 


मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. ज्यावेळी सकाळी हा अपघात झाला, त्यावेळी ज्या कारने धडक दिली आणि त्या दाम्पत्याला फरफटत नेलं, त्या कारमध्ये राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा आणि त्यांचा ड्रायव्हर असल्याचं समोर आलं आहे.

या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे.  मुंबईतील वरळी येथे आज, रविवारी सकाळी 5.30 दरम्यान एक मोठा अपघात झाला. या अपघातात एका कारने दुचाकीस्वाराला फरफटत नेलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर पती थोडक्यात बचावले. परंतु, अपघातानंतर या कारमधील लोकांनी पळ काढला होता. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या कारने अपघात झाला ती कार शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा चालवत होता. त्यांचा ड्रायव्हरही यावेळी कारमध्ये उपस्थित होता. आता याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नेमकं घडलं काय?
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाखवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तत्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.