Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र पोलीस अकादमीतच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार, पोलीस दलात खळबळ

महाराष्ट्र पोलीस अकादमीतच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार, पोलीस दलात खळबळ 


नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलीस कर्मचारी आणि संशयित आरोपीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सुमित याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या तरुणासोबत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते. आरोपीकडून महिलेला शारीरिक संबंधासाठी विचारणा करण्यात आली. तिने नकार दिल्यानं आरोपीने पोलीस महिलेला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. महाराष्ट्र पोलीस अकादमीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. तिथंच असा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीत घडला. महाराष्ट्र पोलीस अकादमीत रात्रभर सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशियत आरोपीने मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपीने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिसात दाखल केली. तक्रार देणारी महिला पोलीस कर्मचारी खाजगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत. बलात्कार आणि मारहाणीनंतर संशयित आरोपीने पीडित महिलेचे व्हिडिओ देखील काढले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.