Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" नमस्कार मी पुणेकर, कृपया जोडप्यांनी " पुण्यातील 'ती ' रिक्षातील भन्नाट पाटी व्हायरल :, वाचाच 'ती ' पाटी

" नमस्कार मी पुणेकर, कृपया जोडप्यांनी " पुण्यातील 'ती ' रिक्षातील भन्नाट पाटी व्हायरल :, वाचाच 'ती ' पाटी 


पुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जातं. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावामुळे चारचौघांत उठून दिसतो. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. आता हेच पाहा ना, एका रिक्षामध्ये लावलेल्या पुणेरी पाटीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. 

कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. ही पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाटी वाचून तुम्हीही पोटधरून हसाल.


पुण्यातल्या रिक्षातली भन्नाट पाटी
रिक्षामध्ये लावलेली पाटी वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय? तर अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अथवा रिक्षामध्ये काही जोडपे अश्लील चाळे करतात. अशा जोडप्यांना ताकीद देणारी सुचना या पुणेरी पाटीवर लिहिली आहे. या पाटीवर रिक्षा मालकानं "नमस्कार, मी पुणेकर जोडप्यांना विनंती आहे गाडीत कुठल्याही प्रकारचे अश्लील चाळे करू नये अथवा पोकळ बांबूचे भरीव फटके दिले जातील" असा मजकूर या पाटीवर लिहिलेला दिसतो. बरं फक्त मराठीत नाही तर इंग्रजीमध्येही या रिक्षाचालकाने पुणेरी पाटी लावली आहे. रिक्षामध्ये येणारे जाणारे सगळे लोक ही पुणेरी पाटी पाहून थांबत आहेत. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अथवा रिक्षामध्ये काही जोडपे अश्लील चाळे करतात. अशा जोडप्यांना ताकीद देत रिक्षामालकानं हा राग पाटीवर व्यक्त केलाय.
पाहा पुणेरी पाटी


हा फोटो @PreetiMuch नावाच्या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर यावर नेटकरीही वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, 'पुणे तिथे काय उणे' दुसऱ्याने लिहिले, 'भावा एक नंबर'


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.