Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल 


आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात गुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यमान आमदार आणि तत्कालीन खासदार रघुराम कृष्णम राजू यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच तत्कालीन सीआयडी प्रमुख पीव्ही सुनील कुमार आणि त्यांचे गुप्तचर प्रमुख पीएसआर अंजनेयुलू यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या सांगण्यावरून पीव्ही सुनील कुमार आणि पीएसआर अंजनेयुलू यांनी आपल्याला विनाकारण अटक करून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी राजू यांनी केला आहे.
रघुराम कृष्णम राजू यांचे आरोप काय?

2021 मध्ये हैदराबादमध्ये सीआयडीने मला अटक केली. कोणतेही ट्रांझिट अटक वॉरंट घेण्यात आले नव्हते. तसेच स्थानिक मॅडिस्ट्रेट कोर्टात हजर न करता सीआयडी कार्यालयात नेण्यात आले. पीव्ही सुनील कुमार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी सीआयडी कार्यालयात आले. त्यांनी रबर बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली, असा आरोप राजू यांनी केला आहे.
तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या दबावामुळे आपल्या हृदयविकारावरील औषधे घेऊ दिली नाहीत. माझी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाल्याचे जगन मोहन रेड्डी यांना माहित असूनही काही लोक माझ्या छातीवर बसले, असा दावाही राजू यांनी केला आहे.

माझा फोन हिसकावून घेतला आणि पासवर्डसाठी मला मारहाण करण्यात आली. सरकारी रुग्णालयातील डॉ. प्रभावती यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. तसेच जगन मोहन रेड्डी यांच्यावर टीका केल्यास जीवे मारण्याची धमकी सुनील कुमार यांनी दिल्याचे रघुराम कृष्णन राजू यांनी पुढे म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.