Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज! अमरावतीच्या सेंट्रल जेलमध्ये स्फोट :, रात्री अचानक झालेल्या बॉम्ब सदृश स्फोटन खळबळ

ब्रेकिंग न्यूज! अमरावतीच्या सेंट्रल जेलमध्ये स्फोट :, रात्री अचानक झालेल्या बॉम्ब सदृश स्फोटन खळबळ 


अमरावती : मध्यवर्ती कारागृहात  रात्री अचनाक झालेल्या स्फोटानं अमरावती  पूर्णतः हादरुन गेलं आहे. अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब सदृश्य स्फोट झाल्यानं मोठा स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. सुदैवाची बाब म्हणजे, या स्फोटात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. अमरावतीचे सीपी-डीसीपी आणि बॉम्ब निकामी पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अचनाक अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात मोठा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. 6 आणि 7 क्रमांकाच्या बॅरेकसमोर हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. रात्री 8.30 च्या सुमारास कारागृहात फटाक्यांची आतषबाजी किंवा बॉम्ब फुटल्याप्रमाणे मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर कारागृह परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी आणि अमरावती पोलीस आयुक्त आणि डीसीपीसह बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले. 
घटनेचा तपास करण्यासाठी तातडीनं फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं. मिडिया रिपोर्ट्सनुसार, शेजारच्या महामार्गाच्या कल्व्हर्टवरून फटाका किंवा बॉम्ब कारागृहात बॉलद्वारे फेकल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. कारागृहात बॉम्ब सदृश वस्तू फेकणारी व्यक्ती कोण? आणि असं करण्यामागे या व्यक्तीचा नेमका हेतू काय? याचा सध्या कारागृह प्रशासनाकडून कसून तपास सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणात सुदैवाची बाब म्हणजे, या प्रकरणात अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 

घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी आणि अमरावती पोलीस आयुक्त आणि डीसीपीसह बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर  अमरावती मध्यवर्ती कारागृहात बॉम्बसदृश वस्तू फेकण्यामागचं कारण तपासण्यात पोलीस सध्या व्यस्त आहेत. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनीही तपास सुरू केला आहे. फोरेन्सिक टीम स्फोटकांसाठी कशाचा वापर करण्यात आला याचाही तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बॉम्ब फेकणाऱ्या व्यक्तीचा नेमका हेतू काय? कशासाठी असं कृत्य केलं? याचा तपास सध्या फॉरेन्सिक टीम आणि कारागृह प्रशासनाकडून केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.