Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत क्रूरतेचा कळस बैलाला(वळू) कुऱ्हाड मारून केले जबर जखमी

सांगलीत क्रूरतेचा कळस बैलाला(वळू) कुऱ्हाड मारून केले जबर जखमी


सांगली दि.16 रोजी सांगलीतील जागृत प्राणी प्रेमींनी मानवतेला काळीमा फासणारी क्रूर घटना उघडकीस आणली,सांगली मध्ये प्राण्यांनसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या काही सदस्यांना माधव नगर परिसरात एका वळुच्या शेपटी जवळ कुऱ्हाड अडकलेली आणि ती तशीच घेऊन वळु फिरत आणि  खूप रक्त स्त्राव झाल्या मुळे अशक्त झालेल्या परिस्तीत आढळला, त्यांनी लगेच मदती साठी इतर सदस्यांना आणि Animal resq & rehabilitation team sangli ,WRC आणि  ॲनिमल राहत च्या सदस्याना माहिती कळवली सर्व जण तातडीने घटना स्थळी पोहचले

घटनेचे गांभीर्य पाहता लागलीच संजय नगर पोलीस स्टेशन मध्ये सदर घटनेची माहिती दिली, कुऱ्हाड इतकी खोल अडकली होती की ती काढण्यासाठी वळुला बेशुद्ध करणे गरजेचे होते,ॲनिमल राहतच्या पशूवैद्यकीयांनी त्या वळूला भुल दिली काही वेळाने वळू बेशुद्ध झाल्यावर त्याची अडकलेली कुऱ्हाड काढली,कुऱ्हाड खोल पर्यंत रुतून बसली असल्याने, कुऱ्हाड काढायला तब्बल तास भर वेळ लागला कुऱ्हाड काढत असताना वळूचे रक्त वाहत होते ते वाहणारे रक्त थांबवून कुराड काढणे गरजेचे होते,ॲनिमल राहतच्या पशूवैद्यकीयांनी शर्तीचे प्रयन्त केले आणि कुऱ्हाड वळूला त्रास होणार नाही अश्या पद्धतीने काढली आणि झालेल्या  जखमेचे ड्रेसिंग केले, नंतर वळूला पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी सुरक्षित स्थळी पाटवण्यात आले,संजय नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व प्राणी मित्र आणि सर्व संस्थेचे सदस्य गेले होते,पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शोधावा अशी मागणी प्राणी मित्र आणि परिसरातून होत आहे, संजय नगर पोलीस स्टेशमध्ये अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.