Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाबा वेंगाची ' ती ' भविष्यवाणी भारतासाठी भीतीदायक ठरणार? एका प्रलयकारी घटनेमुळे घडणार मोठे बदल!

बाबा वेंगाची ' ती ' भविष्यवाणी भारतासाठी भीतीदायक ठरणार? एका प्रलयकारी घटनेमुळे घडणार मोठे बदल!


बल्गेरियाची बाबा वेंगाची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बाबा वेंगाचा मृत्यू होऊन तीन दशके झाली आहेत, मात्र अजुनही त्यांनी अगोदर वर्तवलेल्या भविष्यवाणीमुळे लोक चिंतीत आहेत. २०२५ पासून मानवतेच्या अंताची सुरूवात होणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली होती.
एका पाठोपाठ एक घडणाऱ्या विनाशकारी घटनांमुळे याची सुरूवात होईल असे त्यांनी म्हटले होते. दुसऱ्या महायुध्दाच्या संदर्भात केलेल्या अचूक भविष्यवाणीमुळे बाबा वेंगा सर्वप्रथम प्रकाझोतात आल्या होत्या. १९११ मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांनी वयाच्या १२ व्या वर्षी दृष्टी गमावली होती. १९६६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
मात्र त्यापूर्वी त्यांनी पुढील अनेक शतकांची भविष्यवाणी वर्तवली आहे. माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार बाबा वेंगा यांनी २०२५ च्या संदर्भात जी भाकिते केली आहेत ती अत्यंत भितीदायक आहेत. त्यानुसार मानवतेच्या विनाशाची सुरूवात याच वर्षापासून सुरू होणार आहे.
२०२५ मधील एका प्रलयकारी घटनेमुळे या पतनाची सुरूवात होईल. युरोपात अत्यंत भयावह असा संघर्ष सुरू होईल आणि त्यामुळे प्रचंड विनाश होईल. तेथील मोठ्या लोकसंख्येला याचा फटका बसेल. २०२८ पर्यंत मानव शुक्रापासून उर्जा मिळवण्याचा प्रयत्न करेल.

२०३३ मध्ये मोठा हवमान बदल होईल हिम वितळण्यामुळे समुद्रांच्या पाण्याची पातळी वाढू लागेल. २०७६ पर्यंत जगभरात साम्यवादाचा प्रसार होईल आणि २१३० मध्ये मानवाचा एलियन्सशी संपर्क होईल. २१७० मध्ये जगात सगळीकडे दुष्काळ पडेल.

बाबा वेंगाने सगळ्यांत धक्कादायक भविष्यवाणी ३००५ च्या संदर्भात केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या वर्षात पृथ्वी आणि मंगळ यांच्यात युध्द सुरू होईल. तसेच ३७९७ पर्यंत पृथ्वी मानवाच्या राहण्याच्या लायकीची राहणार नाही.
त्यामुळे मानवजातीला अन्यत्र कुठेतरी आसरा घ्यावा लागेल. ५०७९ पर्यंत पृथ्वीवरील सगळे काही नष्ट झाले असेल असे त्यांनी म्हटले आहे. राजकुमारी डायना यांचा मृत्यू, अमेरिकेवरिल ९/११ चा हल्ला आदींबाबत बाबा वेंगा यांचे भविष्य खरे ठरले होते असे म्हटले जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.