Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली शहरात पूर आल्यास पालक मंत्र्यांना जबाबदार धरणार.:- राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

सांगली शहरात पूर आल्यास पालक मंत्र्यांना जबाबदार धरणार.:- राज्य प्रवक्ते संतोष पाटील.


ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले असते,म्हणजेच ज्या काही घटना घडत असतात त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असो ,मानवनिर्मित आपत्ती असो किंवा एखादी घटना करून जर कोणी यामध्ये दंगल किंवा दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना मधून त्यापासून नागरिकांना धोका होत असेल तरी त्याची  जबाबदारी पालकमंत्र्याची असते. त्याच पद्धतीने अलमट्टी धरणामुळे सांगली शहराला महापुराचा धोका निर्माण होऊ लागला आहे त्यामुळे जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,जर हे घडलेच तर याची जबाबदारी ही पालकमंत्र्याची असेल,कारण अलमट्टी धरणातील  पाण्याची पातळी 31 जुलै अखेर 513.60 मिटर आणि 31 ऑगस्ट पर्यंत 517 मिटर पर्यंत असली पाहिजे असा केंद्रीय जल आयोगाचा निर्देश आहे. परंतु प्रत्यक्षात अलमट्टी धरणाची पाणी पातळी ही 517 मीटर पेक्षा अधिक आहे. धरणात आवक होणाऱ्या पाण्याच्या तुलनेत विसर्ग अत्यंत कमी आहे अलमट्टी धरणातील पाणीसाठा ९७ टीएमसीच्या वर गेला आहे. म्हणजेच अलमट्टी धरण हे 97% भरले आहे. हिप्परगी बंधाऱ्यापर्यंत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.याचाच अर्थ असा आहे की सांगलीचे पालकमंत्री हे कर्नाटक जलसंपदा विभागाशी समन्वयक ठेवण्यास कमी पडतआहेअसे दिसून येते. 

अशीच परिस्थिती राहिल्यास कराड,कोल्हापूर पर्यंत अलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा निर्माण होण्याची शक्यता आहे. याच्यात सर्वात मोठा धोका हा सांगली शहराला बसणार आहे. त्यामुळे ही परिस्थिती ओळखून पालकमंत्र्यांनी हालचाली करायला पाहिजे होत्या त्या होताना दिसत नाहीत.सांगली  शहरात पूर आल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही पालकमंत्र्याची असेल.अशी माहिती राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.