Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जस्टीज लोंयाच्या मृत्यूचे डाग ज्यांच्या कपड्यावर :, अंधारेंनी अमितशांहाचा सगळा इतिहास काढला

जस्टीज लोंयाच्या मृत्यूचे डाग ज्यांच्या कपड्यावर :, अंधारेंनी अमितशांहाचा सगळा इतिहास काढला 


शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असल्याचा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रविवारी उद्धव ठाकरेंना लगावला. शहांनी केलेली टीका शिवसेना ठाकरे गटाला झोंबली आहे.

लागलीच दुसऱ्या दिवशी पक्षाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांना तडिपार, जस्टिस लोयांच्या मृत्यूचे डाग अंगावर असलेल्या व्यक्तीने आम्हाला शिकवू नये असा पलटवार केला.

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर बोलण्याची फार इच्छा नाही म्हणत, ते गृहमंत्री होण्यापूर्वी त्यांच्यावर असलेल्या सर्वच आरोपांची उजळणी केली. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात सुसंस्कृत आणि स्वच्छ कारभार कसा असावा, हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ते शिकवायचेही असेल तर जे प्रचंड स्वच्छ चारित्र्याचे आहेत, अशा लोकांनी शिकवावे. सोहराबुद्दीन एन्काऊंटर किंवा जस्टीस लोया यांच्या मृत्यूचे डाग ज्यांच्या कपड्यांवर आहे. अजूनही ते या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात आहे. ज्यांच्यावर तडीपारीचा शिक्का मोर्तब झाला आहे. अशा तडिपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शिकवण्याची, सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचा समाचार घेतला.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, अमित शहा विसरले आहेत बहुतेक की, महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्यावर, अजित पवारांवर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते. त्यानंतर त्याच सिंचन घोटाळ्याचे प्रमुख आरोपी असलेल्या अजित पवारांना 72 तासांत नरेंद्र मोदी सत्तेत घेऊन बसले होते. तेव्हा तुमच्या तोंडी भ्रष्टाचाराची भाषा बरी वाटत नाही. असा टोला सुषमा अंधारेंनी अमित शहांना लगावला. विविध पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या 90 टक्के लोकांवर मुलूंडचे पोपोटलाल (किरीट सोमय्या) यांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता ते त्यावर तोंड उघडत नाहीत. आम्ही कोण आहोत, काय आहोत त्याचे सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्रातील मराठा - ओबीसींवर अन्याय न होता तोडगा काढण्याची तयारी असेल तर लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही प्रस्ताव मांडा. बघू द्या, तुमची मराठा समाजाला आरक्षण देण्याची किती नियत आहे? असे आव्हान सुषमा अंधारेंनी दिले.

अमित शहांनी शरद पवारांना भ्रष्टाचाराचे मेरुमणी म्हटले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, अमित शहा बोलत आहेत, तेव्हा त्यात काही तथ्य असणार. धनंजय मुंडेंना जर शहांच्या बोलण्यात तथ्य वाटत असेल तर मग नरेंद्र मोदी पवारांना आपला राजकीय गुरु का म्हणून घेतात. नरेंद्र मोदींच्याच सरकारने शरद पवारांना पद्म विभूषण पुरस्काराने का सन्मानित केले, याचेही तथ्य त्यांनी शोधावे, असा टोला अंधारेंनी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहांनी पवारांवर केलेल्या टीकेवर बोलणे टाळले आहे. अजित पवारांना सोयिस्करपणे काही गोष्टी माहित नसतात, असा टोला अंधारेंनी लगावला. गृहमंत्री जेव्हा ठोकून काढायचे आदेश देतात, तेव्हा ते गृहमंत्री आहे की ठोक मंत्री आहे, असा प्रश्न पडतो. असेही एका प्रश्नाच्या उत्तरात सुषमा अंधारे म्हणाल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.