Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आषाढी एकदशीला साबुदाणा खाताय, तर...'हे ' नक्की वाचाच

आषाढी एकदशीला साबुदाणा खाताय, तर...'हे ' नक्की वाचाच 


आषाढी एकादशी असो, अथवा कोणताही उपवास असो प्रत्येक घरात उपसाला साबुदाण्याचे पदार्थ बनवले जातात. साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच पदार्थ टेस्टी लागतात. परंतु या साबुदाण्याबाबत काही समज-गैरसमज आहे. त्याचे काही फायदे आहेत, तर काही तोटे आहेत.

साबुदाणा कंदमुळापासून बनवला जातो. त्यामुळे पारंपरिक उपवासाच्या पदार्थांमध्ये साबुदाण्याचा समावेश करण्यात आला आहे. परंतु साबुदाणा हा मोजक्या प्रमाणात खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे. आतड्यांच्या आरोग्यासाठी साबुदाण्यात चांगले कार्ब्स असतात. पचनाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींसाठी हे चांगले आहे. साबुदाणा खाण्याचे काय फायदे-तोटे आहेत जाणून घेऊया.

साबुदाणा खाण्याचे फायदे

1) साबुदाण्यात लोहाचे प्रमाण योग्य असल्यामुळं रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.

2) साबुदाण्याच्या सेवनामुळं उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते आणि ऊर्जा मिळते.

3) साबुदाण्यामुळे हडासह मासपेशी मजबूत होतात आणि त्यांची वाढही होते.

4) साबुदाण्यामध्ये व्हिटामिन के आणि कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

साबुदाणा खाण्याचे तोटे

1) जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्यास त्याचा परिणाम थेट मेंदू आणि हृदयाला होतो.

2) जास्त साबुदाणा खाल्ल्यानं छातीत दुखणे, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रास होऊ शकतो.

3) मधुमेहाचे रुग्णांनी साबुदाणा खाणे टाळले पाहिजे.

4) तुम्हाला जर मुतखडा असेल तर तुम्ही साबुदाणा न खाणं योग्य ठरेल.

5) लो बीपीचा त्रास असल्यांनी साबुदाणा खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकतं.

साबुदाणा कसा खाल्ला पाहिजे?

1) जर तुम्ही उपवासाच्या दिवशी साबुदाणा खात असाल तर, तो एखाद्या पदार्थामध्ये मिसळून खा, त्यामुळं तुम्हाला उर्जा मिळेल.

2) शरीराला व्यवस्थित प्रोटिन्स मिळावेत यासाठी साबुदाण्याबरोबर दही, दूध घेणे गरजेचे आहे.

3) साबुदाणा पचायला जड असल्यामुळं योग्य प्रमाणात साबुदाणा खाणं पसंत करा.

4) साबुदाणा वड्यापेक्षा खिचडी आणि थालीपीठ खाणे अधिक चांगलं ठरेल

त्यामुळं यंदाच्या आषाढी एकादशीला साबुदाणा खात असाल तर आरोग्याची योग्य काळजी नक्की घ्या. आणि आषाढी एकदशीचा उत्साहात साजरी करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.