Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत तलवारीचा साठा पकडला, एकाला अटक६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कारवाई

सांगलीत तलवारीचा साठा पकडला, एकाला अटक ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कारवाई


सांगली :  सांगली शहरात विक्रीसाठी आणलेल्या धारदार तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तलवारी, दुचाकी असा ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. 
 
भगतसिंग विक्रमसिंग शिख (वय २१, रा. जुना कुपवाड रोड, नेहरूनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विशाळगड येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अवैधपणे शस्त्रे बाळगणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सांगलीचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी शहर पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार निरीक्षक मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.  
त्यानुसार पथक अशा व्यक्तींचा शोध घेत होते. त्यावेळी एक तरूण आष्टा रस्त्यावर कृष्णा नदीजवळ तलवारी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील संतोष गळवे यांना मिळाली. नंतर पथकाने सापळा रचून शिख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीला बांधलेल्या पोत्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये तलवारी सापडल्या. त्यानंतर त्याला अटक करून दुचाकी आणि तलवारी जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, वरीष्ठ निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संतोष गळवे, विनायक शिंदे, गौतम कांबळे, योगेश सटाले, संदीप कुंभार, गणेश कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.