Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पूरग्रस्तांच्या मदतीला धावलायपृथ्वीराज पाटील फौंडेशनचा ‘हात’२५ टेम्पो, ४ बस अन् पन्नासहून अधिक जणांची टीम मैदानात

पूरग्रस्तांच्या मदतीला धावलाय पृथ्वीराज पाटील फौंडेशनचा ‘हात’ २५ टेम्पो, ४ बस अन् पन्नासहून अधिक जणांची टीम मैदानात


सांगली ः कृष्णा नदीचा महापूर अंगणात उभा आहे. तो सांगलीकरांची परीक्षा पाहतोय.  त्याचवेळी या पुराशी लढण्यासाठी मदतीचा हात घेऊन पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे कार्यकर्तेही उभे आहेत. त्यांच्यासोबत २५ टेम्पो आहेत, ४ बस आहे आणि स्वयंसेवकांची मोठी टीम आहे. सांगलीकरांसाठी २०१९, २०२१ नंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मदतीला धावून आले आहेत.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणी पातळी ४० फुटांहून अधिक पातळी होणार आहे. या स्थितीत नदीच्या अगदी काठावरील लोकांचे स्थलांतर सुरु झाले असून त्यासाठी पृथ्वीराज पाटील फौंडेसनने टेम्पो निशुल्क सेवेसाठी धावताना दिसत आहेत. त्यात साहित्य भरण्यासाठीही मदतीची टीम आहे. लोकांना मदतीसाठी पन्नास कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वतः मदत कार्याचा आढावा घेत लोकांना दिलासा देत आहेत. पूर्णवेळ ते पूरपट्ट्यात उभे आहेत. रात्री दोन वाजेपर्यंत मदतकार्य सुरु होते. सौ. विजया पाटील, विरेंद्र पाटील हेही मैदानात उतरले आहेत.  
शहरातील कर्नाळ रोड, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काका नगर, पसायदान कॉलनी, शिवशंभो चौक भागातील लोकांनी सुरक्षित स्थळी जावे, यासाठी काम सुरु झाले आहे. या ठिकाणी पुराचे पाणी येणार आहे. पाणी पातळी किमान ४२ फुटांपर्यंत जाईल, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वेळ न दवडता लोकांनी आधीच सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन करत पृथ्वीराज पाटील फौंडेशनची टीम त्यांच्या मदतीसाठी काम करत आहे. टेम्पोतून साहित्य सुरक्षित स्थळी नेले जात आहे. लोकांची वाहतूकदेखील केली जात आहे. जिल्हा प्रशासनाला या लोकांच्या मदतीसाठी सहकार्य केले जात आहे.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘कृष्णेचे पाणी वाढत असताना सर्वच पक्षातील लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थलांतरासाठी पुढे यावे, अशी स्थिती आहे. संकटाशी एकजुटीने, राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ही वेळ आहे. पाऊस थांबल्याने थोडा दिलासा मिळाला आहे, मात्र कुणीही बेसावध राहू नये. एक हाक द्यावी, आमचा मदतीचा हात पुढे येईल.’’
या मोहिमेत प्रमोद सूर्यवंशी, बिपीन कदम, सनी धोतरे, विशाल हिप्परकर, आयुब निशाणदार, प्रशांत ऐवळे, अल्ताफ पेंढारी, प्रशांत देशमुख, समीर मुजावर, आशिष चौधरी, शितल सदलगे, संतोष भोसले, सतिश जगदाळे, आरबाज शेख, योगेश राणे,  आणि विरेंद्र पाटील आदी सहभागी आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.