Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'तुमचं गॅस कनेक्शन बंद होणार आहे..' तुम्हालाही असा मेसेज आलाय का? आताच सावध व्हा

'तुमचं गॅस कनेक्शन बंद होणार आहे..' तुम्हालाही असा मेसेज आलाय का? आताच सावध व्हा

दिवसेंदिवस सर्वसामान्यांची फसवणूक होण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच तुमच्या घराचा वीज पुरवठा खंडीत होणार आहे, असा मॅसेज देशभरातील लोकांच्या फोनवर आला होता. त्यानंतर आता तुमचं गॅस कनेक्शन बंद होणार आहे, असा मॅसेज अनेकांच्या फोनवर आला आहे. तुम्हाला देखील असा मॅसेज आला असेल, तर आत्ताच सावध व्हा. हा मॅसेज ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. या मॅसेजमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मॅसेजमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. या मॅसेजबाबत आईजीएल ने सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ग्राहकांनी अशा प्रकारच्या मॅसेजवर विश्वास ठेऊ नये, असं आईजीएलने सांगितलं आहे.

मॅसेजमध्ये म्हटलं आहे की, 'प्रिय ग्राहक. तुमच्या गॅस कनेक्शनचं बिल अपडेट झालेलं नाही. त्यामुळे तुमचं कनेक्शन तोडून टाकण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर फोन करा.' या मॅसेजमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अनेकांनी याबाबत संबंधित गॅस कनेक्शनच्या कंपनीकडे तक्रार देखील केली आहे. केवळ मॅसेजच नाही तर फोनवरून देखील ग्राहकांची फसवूणक केली जाते. आपण संबंधित गॅस कनेक्शन कंपनीचा अधिकार बोलत असल्याचं हे लोक ग्राहकांना सांगतात. त्यानंतर तुमच्या गॅस कनेक्शनचं बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडलं जाणार आहे, अशी भिती ग्राहकांना फोनवरून घातली जाते. त्यानंतर जे ग्राहक बिल भरण्यासाठी तयार होतात, त्यांना एक लिंक पाठवली जाते. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं बँक खातं रिकामं होण्याची भिती असते.

या स्कॅमबाबत आईजीएल ने सर्व ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. आईजीएल अधिकाऱ्यांना म्हटलं आहे की, आपण आईजीएलचे अधिकारी बोलत असल्याचं सांगून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. फोनवरील व्यक्तिकडून ग्राहकांना बिल न भरल्यामुळे गॅस कनेक्शन तोडण्याची भीती घातली जाते. ग्राहकांनी अशा कोणत्याही मॅसेजवर आणि फोनवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. आयजीएलच्या अधिकृत वेबसाईट किंवा पर्यायांवर जाऊनच बिल भरा. आपला पासवर्ड, ओटीपी अशी माहिती कोणासोबतही शेअर करू नका. मॅसेजवर पाठवण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका.

काही दिवसांपूर्वीच देशभरातील लोकांच्या फोनवर एक मॅसेज आला होता. मॅसेजमध्ये म्हटलं होतं की, 'प्रिय ग्राहक, आज रात्री ९.३० वाजता तुमच्या घराची वीज कापली जाणार आहे. लवकरात लवकर आमच्या विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.' या मॅसेजमुळे सर्वांमध्येच प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यानंतर लोकांची फवसणूक करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये दहशत पसरवण्यासाठी हा मेसेज पाठविण्यात आला असल्याचे समोर आले. हा मेसेज बनावट असून नागरिकांनी ह्या मेसेजवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.