Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड!

बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड! 

बीसीसीआय कमाईत अव्वल स्थानावर : जगामध्ये सर्वाधिक पहिला जाणार आणि खेळाला जाणार खेळ म्हणजेच क्रिकेट. त्याचबरोबर क्रिकेट खेळणारे आणि खेळाला पाहणे पसंत करणारे लोक जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अधिकृतपणे १०८ देशांना मान्यता दिली आहे. यामध्ये १२ पूर्ण आणि ९६ सहयोगी सदस्यांचा सहभाग आहे. जगभरामध्ये १०८ क्रिकेट बोर्ड आहेत. परंतु या १०८ क्रिकेट बोर्डांपैकी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा म्हणजेच बीसीसीआयचा (BCCI) प्रभाव सर्वाधिक आहे. कारण पहिल्या १० अव्वल क्रिकेट बोर्डांपैकी ८५ % टक्के कमाई फक्त बीसीसीआयची आहे. यामुळे बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड देखील म्हटले जाते.

भारताच्या क्रिकेट बोर्ड हा अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डचा नंबर येतो. तिसऱ्या स्थानावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड तर चौथ्या स्थानावर शेजारील देश पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा नंबर आहे. त्यानंतर पाचव्या स्थानावर बांगलादेश क्रिकेट बोर्डचा नंबर आहे. पहिला क्रिकेट बोर्ड आणि दुसऱ्या क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. कारण बीसीसीआयच्या अर्ध्यापेक्षा पण कमी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डची कमाई आहे.

भारतामध्ये क्रिकेटचे वेडे चाहते आहेत. भारतीय क्रिकेट खेळाडूंना चाहते भरभरून प्रेम देत असतात. आताच्या घडीला प्रत्येक देशाला भारताविरुद्ध खेळायचे आहे, कारण त्यातून त्यांना चांगले पैसेही मिळतात. मीडियाच्या माहितीनुसार बीसीसीआयची संपत्ती ही सुमारे २.२५ अब्ज डॉलर आहे. म्हणजेच भारतच्या रुपयांमध्ये सांगायचे झाले तर १८,७०० कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. ही रक्कम ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या २८ पट जास्त आहे. बीसीसीआयचे कमाईचे मुख्य कारण म्हणजेच आयपीएल. आयपीएलमध्ये खेळाडूंवर कोट्यवधी पैसे उधळले जातात. आयपीएलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे बीसीसीआयच्या कमाईतही प्रचंड वाढ होत आहे. आता बीसीसीआयने महिला आयपीएलही सुरू केले आहे, त्यामुळे बीसीसीआयची कमाई आणखी वाढली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI): सुमारे $२.२५ अब्ज म्हणजेच १८,७०० कोटी रुपये

क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA): सुमारे ७९ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६६० कोटी रुपये

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB): सुमारे $५९ दशलक्ष म्हणजेच ४९२ कोटी रुपये

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB): सुमारे ५५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ४५९ कोटी रुपये

बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB): सुमारे ५१ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ४२६ कोटी रुपये

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA): सुमारे ४७ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ३९२ कोटी रुपये

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड (ZCB): सुमारे ३८ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ३१७ कोटी रुपये

श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC): सुमारे २० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १६७ कोटी रुपये

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड (WICB): सुमारे १५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १२५ कोटी रुपये

न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (NZC): सुमारे ९ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ७५ कोटी रुपये.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.