Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीकर नागरिकांनो घाबरू नका, शासन व आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोतआमदार सुधीरदादा गाडगीळ; सांगलीतील पूरग्रस्त भागात पाहणी व मदतकार्य

सांगलीकर नागरिकांनो घाबरू नका, शासन व आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत आमदार सुधीरदादा गाडगीळ; सांगलीतील  पूरग्रस्त भागात  पाहणी व मदतकार्य 


सांगली, दि. २६ जुलै : शहरातील तसेच सांगली विधानसभा क्षेत्रातील सर्व पूरग्रस्त भागात आमदार सुधीरदादा गाडगीळ सातत्याने पाहणी करून लोकांच्या मदत कार्यात कार्यकर्ते समवेत फील्डवर आहेत. लोकांना दिलासा देत आहेत तसेच शासन यंत्रणेबरोबर संपर्क साधून मदतकार्याला वेग गती देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी ते सातत्याने संपर्कात असून अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक शासनाबरोबर सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत, असेही आमदार गाडगीळ यांनी सांगितले.

त्यांनी आवाहन केले की हे निसर्गाचे संकट आहे. सांगलीतील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, धीर सोडू नये.शासन या संकटात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आहे. शासन पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असे त्यांनी सांगितले आहे.
आमदार गाडगीळ म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनीही  पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. शासन यंत्रणेला गती दिली आहे. तसेच ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजना सुरू करून काही पाणी दुष्काळग्रस्त पूर्व भागात वळवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार म्हैसाळ योजना कार्यान्वित होईल.

दरम्यान आमदार गाडगीळ यांनी जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी,  काकानगर, शिवशंभो चौक, कर्नाळ रोड पोलीस चौकी, वखारभाग इदगाह मैदान जवळ, सांगलीवाडी गावडे मळा कदमवाडी रोड, त्रिशूल घाट हिंदू स्मशानभूमी आदी भागात फिरून पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच पूरग्रस्त किंवा पुराची भीती वाटत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांना दिलासा दिला. स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी, तसेच जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्याशी आमदार गाडगीळ सातत्याने बोलत आहेत. 

त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता तसेच अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळे यांच्या बरोबरही त्यांचा सतत संपर्क असून परिस्थिती बिकट झाल्यास तातडीने लोकांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. पुराचे संकट अधिक गंभीर झाल्यास शासनाने तातडीने मदतीची पावले उचलावी त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते सतत संपर्क साधून आहेत. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष तसेच आमदार सुधीर गाडगीळ युवा मंचचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक सतत पुरग्रस्त भागाच्या संपर्कात आणि मदत कार्याला गती देण्यामध्ये व्यस्त आहे आहेत.
सांगलीतील पूरग्रस्त तसेच पुराची धास्ती असलेल्या भागात आमदार सुधीरदादा गाडगीळ सातत्याने पाहणी आणि दिलासा देण्याचे काम करत आहेत. तसेच शासन यंत्रणेबरोबर संपर्क साधून संभाव्य  पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठीही सज्जता करण्यास सांगत आहेत. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य पाटील, धीरज सूर्यवंशी, इम्रान शेख, शरद देशमुख, युवा मंच चे विश्वजित पाटील, चेतन माडगुळकर, अमित देसाई, अंकुश जाधव, अनिकेत बेळगावे, रघुनाथ सरगर, अनिकेत पाटील, जगन्नाथ साळुंखे, अभिषेक कुलकर्णी, आदी पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.