Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! अल्पवयीन मुलींनी दारू पार्टी केली :, नंतर घडले असे काही की......

धक्कादायक! अल्पवयीन मुलींनी दारू पार्टी केली :, नंतर घडले असे काही की......


पुणे : कल्याणीनगर अपघातप्रकरणात अल्पवयीन मुलांनी केलेल्या दारू पार्टीचे प्रकरण आणि त्यानंतर झालेला अपघात ताजा असताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, येरवडा भागात १६ वर्षीय मुलींनी राहत्या घरात दारू पार्टी केली. दारू पार्टीनंतर एकीने मद्याच्या नशेतच गळफास लावून घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
तनिषा शांताराम मनोरे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तर, दुसरी एक १६ वर्षीय मुलगी दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत आढळून आली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तनिषा लक्ष्मीनगरमधील वडार वस्ती भागात राहण्यास आहे. ती आकरावीच्या वर्गात शिकते. तर तिची आई भाजी विक्रीचा व्यावसाय करते. आई आणि ती घरी राहतात. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ती आणि तिच्या एका मैत्रिणीने तनिषाच्या घरी दारू पार्टी केली.
दरम्यान, तनिषाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाला तनिषाच्या मैत्रिणीने फोनकरून रात्री आठच्या सुमारास बोलवले होते. तेव्हा तो मुलगा तनिषाच्या घरी आला. त्याने घरात पाहिले असता त्याला तनिषाने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्याने तनिषाला खाली उतरवून तोंडावर पाणी मारले. त्यानंतर लागलीच तनिषाच्या आईला घटनेची माहिती दिली. त्यानंतर आई घरी आली. त्यांनी तनिषाला रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यापुर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. त्याचवेळी तनिषाची मैत्रिण देखील बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यांनी तिला उठविले. तेव्हा ती दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आले. तिच्या आई-वडिलांनी लागलीच तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता या दोघींनी दारू पार्टी केल्याचे समोर आले आहे. दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या देखील केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पार्टीत त्यांना दारूची नशा जास्त झाली होती. त्यात मैत्रिण बेशुद्ध पडली. त्यामुळे तनिषाने कधी गळफास घेतला हे समजू शकलेले नाही. तर तिने गळफास लावून आत्महत्या का केली, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.