Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टेन्शन मुक्त करणारी पोस्ट ऑफिसची खास योजना

टेन्शन मुक्त करणारी पोस्ट ऑफिसची खास योजना

आपल्या कष्टाने कमावलेले पैसे सुरक्षित आणि चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवून निवृत्तीनंतर मासिक उत्पन्न मिळवायचे असेल तर लक्ष द्या. आपल्या ठेवी सुरक्षित ठेवून तुम्ही दरमहा बचतीतून महिना मोठी कमाई करू शकता. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या काही रिस्क फ्री आणि गॅरंटीड रिटर्न स्कीम तुमच्यासाठी काम करतील.

पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम मंथली इनकम अकाउंट हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे जो कोणासाठीही नियमित उत्पन्नाचा स्रोत बनू शकतो. दर महा स्थिर उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्यासाठी एक मजबूत पर्याय ठरू शकते. विशेषत: निवृत्तीनंतर या योजनेचा लाभ घेता येईल.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) साठी एकाच खात्याद्वारे जास्तीत जास्त ठेव मर्यादा 9 लाख रुपये आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जॉइंट अकाऊंट उघडत असाल तर ही मर्यादा 15 लाख रुपये आहे. या खात्यावरील व्याजदर वार्षिक 7.4 टक्के आहे.

नियमित उत्पन्न कसे असेल

* व्याजदर : 7.4 टक्के वार्षिक

* जॉईंट खात्यातून जास्तीत जास्त गुंतवणूक : 15 लाख रुपये

* वार्षिक व्याज: 1,11,000 रुपये

* मासिक व्याज: 9250 रुपये

त्यात जमा झालेल्या पैशांवर जे काही वार्षिक व्याज आहे, ते 12 भागांमध्ये विभागले जाते आणि ते दर महिन्याला तुमच्या खात्यात येते. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे, परंतु 5 वर्षानंतर नवीन व्याजदरानुसार ती वाढवली जाऊ शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस सांगली दर्पण जबाबदार राहणार नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.