Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार कितीये? तुम्हाला माहितीये का..? आकडा ऐकून अवाक व्हाल!

मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार कितीये? तुम्हाला माहितीये का..? आकडा ऐकून अवाक व्हाल! 


देशातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांमधील अधिकाऱ्यांचे पगार हे किती असतात. याबाबत हल्ली सर्वांनाच माहिती असते. तर कुशल कर्मचाऱ्यांना देखील कंपनीत मिळणाऱ्या पगाराच्या रेंजबाबत तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, आज तुम्ही एका फोर व्हीलर कारच्या ड्रायव्हरचा गलेलठ्ठ पगार ऐकून तुम्ही चक्रावल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही म्हणाल असा कोणता ड्रायव्हर आहे? ज्याला वर्षाला लाखांमध्ये पगार मिळत आहे. तर आज आपण तब्बल २४ लाख रुपये वार्षिक पगार मिळवणाऱ्या ड्रायव्हरबाबत जाणून घेणार आहोत…

संपत्ती १२२ अब्ज अमेरिकन डॉलर्स
उद्योगपती मुकेश अंबानी यांची संपत्ती सर्वश्रुत आहे. फोर्ब्सच्या अधिकृत माहितीनुसार, ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १२ व्या क्रमांकावरून 11 व्या स्थानावर झेपावले आहेत. त्यांची एकूण अंदाजित संपत्ती १२२ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. ही आकडेवारी १७ जुलै २०२४ पर्यंतची आहे.
किती आहे अंबानी यांच्या ड्रायव्हरचा पगार?

तर त्याचे असे आहे की, उद्योगपती मुकेश अंबानी हे आपल्या ड्रायव्हरला महिन्याकाठी किती पगार देतात. हे एकूण तुम्ही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी आपल्या ड्रायव्हरला प्रति महिना 2 लाख रुपये इतका पगार देतात. अशा प्रकारे त्याचे वार्षिक उत्पन्न 24 लाख रुपये इतके आहे. अंबानी यांच्या ड्रायव्हरला अवघड ट्रेनिंग देण्यात आली आहे. तो कॉमर्शियल आणि लक्झरी असे कोणत्याही प्रकारचे वाहन हाताळू शकतो.

राहतात आलिशान घरात
विशेष म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कमाईला तोड नाहीये. मागील आठवड्यात त्यांच्या कमाईत तब्बल २५००० कोटींची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे जागतिक सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत त्यांनी ११ व्या स्थानावर उडी घेतली आहे. मुकेश अंबानी हे देशातील सर्वात आलिशान घरात राहतात. तर त्यांचे घर अँटिलिया हे जगातील सर्वाधिक महागड्या घरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.