Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास आपण इच्छुक आहात? मग 'असा' करतात नोकरीसाठी अर्ज

रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास आपण इच्छुक आहात? मग 'असा' करतात नोकरीसाठी अर्ज 


रिलायन्स इंडस्ट्रीची काही ओळख देण्याची गरज नाही. आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा हा जगभरात पसरलेला व्यवसाय आहे. टेलीकम्यूनिकेशंसपासून ते मीडिया आणि इंटरटाइनमेंटपर्यंत तर पेट्रोकेमिकल्सपासून रिटेलपर्यंत, रिलायन्सच्या व्यवसायाचे जाळे पसरले आहे. भारतातील अनेक युवक रिलायन्स मध्ये काम करण्यास इच्छुक नक्कीच असतील. जर तुम्हालाही रिलायन्ससाठी काम करून तुमचा करिअर घडवायचं असेल तर हा लेख नक्की पूर्ण वाचा.

रिलायन्समध्ये काम करण्यापूर्वी हे ठरवलं पाहिजे कि तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे. वर सांगितल्याप्रमाणे, रिलायन्सचे जाळे खूप मोठे आहे. विविध क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. म्हणून आधी हे ठरवले पाहिजे कि, तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड, रिलायन्स जिओइन्फोकॉम लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड यापैकी नक्की कुठे काम करायचे आहे? प्रत्येक कंपनीचे वेग्वेगळ्या पदांसाठी काही ना काही अटीशर्ती असतात. कंपनीमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असेलेल्या उमेदवाराला त्या अटीशर्तींची पात्रता करावी लागते. पात्र उमेदवारालाच संधी दिली जाते. रिलायन्समध्ये काम करण्यासाठी इच्छुक व्यक्ती मुख्यता इंजिनिअर असावा किंवा त्याने बिजनेस मैनेजमेंट केलेले असावे. विविध पदांसाठी विविध अटीशर्ती लागू होतात.

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जॉबच्या संधी पाहण्यासाठी प्रथम रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची अधिकृत वेबसाइटवर www.ril.com वर जा. येथे त्यांच्या करिअर पृष्ठावर क्लिक करा. यानंतर 'सर्च ऑपरचुनिटीज' वर जा.यापुढे एक नवीन पेज तुमच्या समोर येईल. येथे तुमच्या जॉब संबंधित की वर्ड्स टाकून तुमच्या इच्छेनुसार जॉब सर्च करा. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्या प्रत्येक इंडस्ट्रीमधील जॉब सहज शोधू शकता. त्यांचे वेब पेज तुम्हाला नेटवर सहज सापडतील. तुमच्या इच्छेचा जॉब मिळताच तेथे अप्लाय करा. फॉर्ममध्ये मागितलेली माहिती तसेच डॉक्युमेंट्स सबमिट करा. प्रत्येक पदासाठी, पदानुसार तसेच अनुभवानुसार दर माह वेतन ठरवलं जातो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.