Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एस टी बसचा अपघात; तिघांची प्रकृती गंभीर, तर सहा प्रवासी जखमी

शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एस टी बसचा अपघात; तिघांची प्रकृती गंभीर, तर सहा प्रवासी जखमी
 

बुलढाणा : बुलढाणा  जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. यात एका एस टीचा भीषण अपघात झाला आहे. शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एस टी बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात झालाय. नांदुरा-मलकापूर दरम्यान तांदुळवाडी जवळ या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 

प्रथमिक माहितीनुसार या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. तर त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर बस घसरून पलटी झाल्याच्या प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर अपघातातील जखमींवर सध्या खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

गेल्या 18 महिन्यात हिट अँड रनच्या एकूण 328 च्या घटना

नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये मागच्या 18 महिन्यात हिट अँड रन च्या एकूण 328 च्या घटना घडल्याचे पुढे आले आहे. यात मागच्या 18 महिन्यात नागपूर जिल्ह्यात 189 हिट अँड रन च्या घटनेची नोंद झाली आहे. तर शहरात 18 महिन्यात 139 हिट अँड रन च्या घटना घडल्या आहेत. नुकतेच केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी रस्ते सुरक्षेचा आढावा घेतला त्यात हि माहिती पुढे आली आहे. नागपूर शहरात रस्ते अपघात कमी करण्यासंदर्भात अपघात निवारण समितीची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडली.

यात शहरात होत असलेल्या हिट अँड रनच्या घटना असो, की ब्लॅक स्पॉटमुळे होणारे अपघात, हे रोखण्यासाठी उपाययोजनेच्या संदर्भात ही बैठक पार पडली. रविभवन येथील बैठकीत संबंधित उच्च पदस्थ अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह आरोग्य विभाग, नागपूरात वाहतूक जनजागृतीसाठी काम करणाऱ्या एनजीओचा सहभाग होता. यावेळी मंत्री नितीन गडकरी बोलत होते.

देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू

नागपुरात 800 ते 1000 लोकांचा दरवर्षी अपघातात मृत्यू होतो. देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू होतो. या अपघातात मृत्यमुखी होणारे 65% मृतक हे 18 ते 34 वयोगटातील आहे. परिणामी, नागपूर शहरात होणारे अपघात आणि या अपघतांसाठी कारण ठरलेले ब्लॅक स्पॉट शोधले आहेत. तसेच त्यावर सध्या काम सुरू असल्याच समाधान केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.