Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुर्दैवी! पंढरपूरला निघालेल्या बसचा मोठा अपघात, एक्सप्रेस वेवरच संपली वारी

दुर्दैवी! पंढरपूरला निघालेल्या बसचा मोठा अपघात, एक्सप्रेस वेवरच संपली वारी 


मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ बसची ट्रॅक्टरला धडक बसून खड्ड्यात पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती, नवी मुंबईचे डीसीपी पंकज डहाणे यांनी दिली.

या अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, ५४ वारकरी पंढरपूरकडे जात होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्बल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी आहेत, तर २० ते ३० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.