Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हत्तीरोग म्हणजे काय? कशामुळे होतो, त्याला आळा घालने शक्य आहे का? जाणून घ्या

हत्तीरोग म्हणजे काय? कशामुळे होतो, त्याला आळा घालने शक्य आहे का? जाणून घ्या 


हत्तीरोग डास चावल्याने जंतू संसर्गामुळे होणारा रोग आहे. हत्तीरोग झालेल्या रुग्णाच्या पायला खूप जास्त सूज येते. ज्यामुळे पायाचा आकार बदलतो आणि पाय विद्रुप झालेला दिसून येतो 'क्युलेक्स' प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग पसरतो. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार क्यूलेक्स डास हत्तीरोगास कारणीभूत 'बुचेरिया बॅनक्रॉफ्टिया' या परजीवी जंतूंचा प्रसार करतात.

डास चावल्यामुळे हत्तीरोग होतो. क्यूलेक्स प्रजातीचे डास हत्तीरोगासाठी कारणीभूत 'बुचेरिया बॅनक्रॉफ्टिया' या परजीवी जंतूंचे वाहक असतात. हा परजीवी वाहक डास मानुष्याला चावल्यानंतर हत्तीरोगाचे जंतू माणसाच्या शरीरात सोडतो. माणसाच्या शरीरात हे जंतू चावलेल्या ठिकाणाहून किंवा अन्य ठिकाणाहून त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. प्रौढ अवस्थेमध्ये हत्तीरोगाचे जंतू लसिका संस्थेच्या वाहिन्यांमध्ये राहतात. लसिका संस्था ही लसिकाग्रंथी आणि लसिका वाहिन्यांची बनलेली यंत्रणा असून ती शरीरातील रोगप्रतिकारशक्ती अबाधित ठेवण्याचे कार्य करते.

लक्षणे काय?
१) आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हत्तीरोगाच्या लक्षणाच्या चार अवस्था असतात.

२) जंतू शरीरात शिरकाव केल्यानंतर आजाराची लक्षणे दिसून येऊ शकतात.

३) लक्षणविरहित किंवा वाहक अवस्थेमध्ये रुग्णाच्या रात्री घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यात मायक्रो

४) फायलेरिया आढळून येतात. मात्र, रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत.

५) तीव्र लक्षण अवस्थेत- ताप येतो, लसिकाग्रंथींचा दाह सुरू होतो. लसिकाग्रंथींना सूज येते किंवा पुरुषांमध्ये वृषणदाह सुरू होतो.

६) दीर्घकालीन संसर्गावस्थेत, हात, पाय आणि बाह्य जननेंद्रियांमध्ये सूज येते.
तज्ज्ञ सांगतात...

हत्तीपाय ग्रस्त रुग्णांनी तीव्र लक्षणे टाळण्यासाठी पायांची किंवा बाधित अवयवांची साबण आणि पाण्याने स्वच्छता ठेवावी. पायाच्या आकाराप्रमाणे चपला घालाव्यात. पायाला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखावी.

प्रतिबंधात्मक उपाययोजना काय?
१) डास अळी अवस्थेत असताना डासांची उत्पत्ती स्थाने कमी करणे.

२) मैला, घाण यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे.

३) साचलेल्या पाण्यातून वनस्पती, गवत काढून टाकणे.

४) कीटकनाशकांची फवारणी करणे.

५) लोकांमध्ये हत्तीरोगाबाबत जनजागृती करणे.

६) हत्तीरोग झालेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी.
क्युलेक्स डासांची उत्पत्ती कुठे होते ?

तज्ज्ञांच्या मते, क्यूलेक्स प्रजातीचे डास दूषित पाणी आणि घाणीच्या जागी मोठ्या प्रमाणात वाढतात. मुंबई महापालिकेचे अधिकारी सांगतात, क्युलेक्स प्रजातीचे डास बांधकाम मजुरांची घरे, पडक्या इमारती, नाल्यांच्या बाजूला असणारी घरे या परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. कोरोनानंतर मुंबईत गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर हत्तीरोग पसरवणारे वाहक डास आढळून आले होते. ८ ते १६ महिन्यांचा कालावधीत हत्तीरोगाच्या लक्षणे दिसून येतात.

रोगाची लागण कोणाला होऊ शकते?
१) सर्व वयोगटातील व्यक्तींना हत्तीरोगाची लागण होऊ शकते.

२) स्त्री आणि पुरुष दोघांनाही हत्तीरोग होऊ शकतो.

३) हत्तीरोगाचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरात पुरुषांमध्ये हत्तीरोगाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.

५) काम आणि इतर कारणांमुळे वारंवार स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे एका भागातून दुसऱ्या भागात हत्तीरोगाचा प्रसार होतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.