Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाणे बेलापूर रोडवर गॅस सिलेंडरचा ट्रक पलटी

ठाणे बेलापूर रोडवर गॅस सिलेंडरचा ट्रक पलटी


नवी मुंबई: ठाणे बेलापूर रोडवर ऐरोली येथील सिमेन्स कंपनीसमोर बुधवारी पहाटे गॅस सिलेंडर चा ट्रक पलटी झाला. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. गॅस सिलेंडर घेऊन जाणा-या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे सकाळी सात वाजता हा अपघात झाला.

गॅस गळतीच्या भितीने या मार्गावरून जाणारे प्रवासी व वाहनधारकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलिसांना व महानगर पालिकेच्या आपत्कालीन विभागास याविषयी माहिती दिली. ऐरोली अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून ट्रक बाजूला करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. ट्रक सरळ करताना गॅस गळती व इतर दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. ट्रकमध्ये सिलेंडर भरल्यानंतर व्यवस्थित बंद केलेला असल्यामुळे अपघातानंतरही सिलेंडर रोडवर पसरले नाहीत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.