Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" भारत पाकिस्तानात खेळला नाही तर... " पाकिस्ताननें दिली BCCI ला धमकी

" भारत पाकिस्तानात खेळला नाही तर... " पाकिस्ताननें दिली BCCI ला  धमकी 


इस्लामाबाद : २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. त्यातच भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे ठिकाण बदलण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्याची विनंतीही मंडळाने केली आहे.

अशा परिस्थितीत भारतीय संघ आपला सामना पाकिस्तानऐवजी दुसऱ्या देशात खेळणार आहे. बीसीसीआयच्या मागणीला पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने जोरदार विरोध दर्शवला. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तानला आला नाही तर पाकिस्तानी क्रिकेट संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकावर बहिष्कार टाकेल, अशी धमकी दिली. 

जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, जर भारतीय संघ २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करत नसेल तर पाकिस्तान २०२६ मध्ये भारताचा दौरा करणार नाही. आयसीसीची वार्षिक परिषद १९ ते २२ जुलै दरम्यान कोलंबो येथे होणार आहे. यावेळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी हायब्रीड मॉडेलच्या कोणत्याही योजनेला विरोध करेल, अशी माहिती जियो न्यूजने आपल्या अहवालात दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.