Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार गोरेबाबत न्यायालयानं सक्त ' ताकीद ' देताच 'AC ' तही पोलिसांना फुटला 'घाम' कोर्टात नेंमक काय घडलं?

आमदार गोरेबाबत न्यायालयानं सक्त  ' ताकीद ' देताच 'AC ' तही पोलिसांना फुटला 'घाम' कोर्टात नेंमक काय घडलं?


कोरोनाकाळात मृत रूग्णांना जिवंत असल्याचं दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप करत साताऱ्यातील एका व्यक्तीनं भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा, गोरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गांभीर्यानं घ्या, अशी सक्त ताकीद उच्च न्यायालयानं सातारा पोलिसांनी दिली आहे. यावेळी उच्च न्यायालयानं  पोलिसांचीही कानउघडणी केली आहे.

पोलिसांनी सादर केलेल्या मृत्यू दाखल्यासंबंधी सर्व कागदपत्रांची आम्हीच छाननी करू. पोलिसांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र कचरा पेटीत टाकण्यासारखे आहे, असं न्यायालयानं म्हणताच तपास अधिकाऱ्यांना 'एसी' कोर्टरूममध्ये 'घाम' फुटला. 'एसी' सुरू असताना तुम्हाला कसा 'घाम' फुटला, असा प्रश्न न्यायालयानं तपास अधिकाऱ्यांना विचारला.

कोरोना महामारीत भाजपचे आमदार जयकुमार गोरे  यांनी कोरोना रूग्णांवरील उपचारांच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांचा घोटाळा केला. 200 हून अधिक मृत रूग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनांतून निधी लाटला, असे गंभीर आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात सातारा जिल्ह्यातील मायणी ( ता. खटाव ) येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी दाखल केली होती.

याप्रकरणी जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर काही जणांवर तातडीनं गुन्हे दाखल करावेत. तसेच, संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या  सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या नियंत्रणांखाली करण्यासाठी न्यायालयानं निर्देश द्यावे, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली होती.

सोमवारी न्यायालयात काय घडलं?
याप्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी "प्रथमदर्शनी घोटाळा झाल्याचं दिसत आहे. सर्व मृत्यू प्रमाणपत्रांची छाननी करू," असं न्यायालयानं म्हटलं.

यावर मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर म्हणाले, "पोलिस कागदपत्रे तपासतील आणि पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करतील." तर, "गोरे यांच्यावर करण्यात आलेला भ्रष्टाचाराचा आरोप गांभीर्यानं घ्या," असं न्यायालयानं सांगितलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.