Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केवळ आधारकार्डवर मिळणार 50 हजारांचे कर्ज :, सरकारची नवी योजना जाणून घ्या

केवळ आधारकार्डवर मिळणार 50 हजारांचे कर्ज :, सरकारची नवी योजना जाणून घ्या 


केंद्र सरकार हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत असतात. ज्याचा फायदा सगळ्याच सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. आता अशीच एक सरकारकडून योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव पंतप्रधान स्वानिधी योजना असे आहे. 
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. आणि यावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही. जर तुम्ही ही रक्कम एका वर्षाच्या आत परत केली, तर तुम्हाला दुप्पट रक्कम देखील कर्ज म्हणून मिळते. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रकारच्या गॅरंटीची गरज देखील लागणार नाही.
सर्वसामान्य लोकांना ज्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायद्याची योजना आहे. गरीब लोकांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या मदतीने सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचा रोजगार सुरू करण्याला खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे देशातील अल्पभूधारक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आता या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

काय आहे स्वानिधी योजना ?
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारकांना कर्ज मिळत आहे.
या योजनेचा लाभ लहान आणि मध्यम व्यवसाय घेऊ शकतात.
या योजनेअंतर्गत तुम्हाला 50 हजार रुपये कर्ज म्हणून मिळते.
हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासहर्ता निर्माण करावी लागेल.
कर्जाची परतफेड केल्यावर तुम्हाला दुसऱ्यांदा दुप्पट रक्कम कर्ज म्हणून मिळेल.
योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. या अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जोडावी लागेल. त्यानंतर तुमचा अर्ज आणि कामाची छाननी केली जाईल. आणि त्यानंतरच तुम्हाला कर्जाची रक्कम दिली जाईल.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र

अर्जदाराची ओळखपत्र आणि आधार कार्ड
पॅन कार्ड
बँकेत बचत खाते
उत्पन्नाचा स्त्रोत

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.