Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशाळगड 'अतिक्रमण हटाओ 'ला हिंसक वळण :, परिसरात तणाव,दगड फेक,घरांची जाळपोळ, 4 चाकी उलटून टाकल्या

विशाळगड 'अतिक्रमण हटाओ 'ला हिंसक वळण :, परिसरात तणाव, दगड फेक,घरांची जाळपोळ, 4 चाकी उलटून टाकल्या 


कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईला हिंसक वळण लागले. प्रत्यक्ष गडावर पोलिसांनी कोणालाही सोडले नाही, पण त्याचवेळी संतप्त जमावाने गडाला लागून असलेल्या गजापुरात काही घरे पेटवून दिली. गाड्यांवर तुफान दगडफेक करून काही चारचाकी गाड्या उलथून टाकल्या. 

एका घराला लावलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला, त्याच घरात अन्य चार भरलेली सिलिंडरही होते, पण वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या प्रकारात काही ठिकाणी तलवारी, कोयते, कुदळ यांचाही वापर करण्यात आला. या प्रकाराने विशाळगडासह गजापुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेनंतर या परिसरातील पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला. या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
आज सकाळी पोलिसांना चकवा देऊन प्रत्यक्ष गडावर आलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी असलेल्या मुख्य धार्मिक स्थळावर दगडफेक केली. या संतप्त जमावाला पोलिसांनी खाली पाठवले. दुपारी साडेबाराच्या सुमारास संभाजीराजे गडावर पोहोचले. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही होते. पोलिसांनी त्यांना गडाच्या पायऱ्याजवळ अडवले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्री जोपर्यंत अतिक्रमणे तत्काळ काढण्याचे आदेश देत नाहीत तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.

जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून दिला. ज्या अतिक्रमणांचे वाद न्यायालयात आहेत ती सोडून उर्वरित अतिक्रमणे काढण्याचे काम सोमवार (ता.१५) पासून सुरू करतो, असे आश्वासन शिंदे यांनी संभाजीराजांना दिले. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कार्यकर्त्यांना गड सोडण्याची विनंती केली. संभाजीराजे व पोलिस, प्रशासनात चर्चा सुरू असताना विशाळगडाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिस वर सोडत नसल्याने संतप्त झालेल्या या कार्यकर्त्यांनी पायथ्याला लागून असलेल्या गजापुराकडे आपला मोर्चा वळवला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.