Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रुणालयातील उपचार होणार स्वस्त? बजेटमध्ये ' या ' 4 गोष्टीबाबत खुशखबर मिळणार?

रुणालयातील उपचार होणार स्वस्त? बजेटमध्ये ' या ' 4 गोष्टीबाबत खुशखबर मिळणार?


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जूनमध्ये लागला व नंतर केंद्रात तिसऱ्यांदा भाजपचं सरकार स्थापन झालं. 23 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील. या बजेटमध्ये सरकार हेल्थ सेक्टरबद्दल काही घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपचार स्वस्त व्हायला मदत होऊ शकते कशावर मिळू शकते सूट

1. इन्शुरन्सवर जीएसटी सूट

हेल्थ इन्शुरन्स असो वा टर्म इन्शुरन्स, आता इन्शुरन्स घेणं खूप महाग झालं आहे. या इन्शुरन्सवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. त्यामुळे इन्शुरन्सचा प्रीमियम जास्त महाग होतो. तज्ज्ञांच्या मते, इन्शुरन्सवरचा जीएसटी कमी केला गेला तर त्याचा फायदा जास्तीत जास्त व्यक्ती घेऊ शकतील.

कॉन्फेडरेशन ऑफ जनरल इन्शुरन्स एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाने (CGIAI) हेल्थ इन्शुरन्सवरचा जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याची मागणी केली आहे. सीजीआयएआयचे संयोजक लोकेश केसी यांच्या मते, मागच्या काही काळापासून उपचार खूप महाग झाले आहेत. प्रीमियमवरचा जीएसटी कमी केल्यास इन्शुरन्स घेणाऱ्यांना त्याचा फायदा होईल.

2. 80D मध्ये सवलत मर्यादा वाढवणं
इन्कम टॅक्सच्या कलम 80D अंतर्गत, सामान्य नागरिकांना सध्या उपचारांसाठी 25,000 रुपयांपर्यंत करसवलत मिळते. ही सवलत मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते, असं मानलं जात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही सवलत 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात यावी. कारण ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारांवर सरासरीपेक्षा जास्त पैसे खर्च होतात.
3.आयुष्मान योजनेत कव्हर वाढू शकतं

बजेटमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (AB-PMJAY) कव्हर वाढवून दुप्पट केलं जाऊ शकतं. सध्या पात्र व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंतचं कव्हर मिळतं. हे दुप्पट झाल्यास पात्र उमेदवारांना 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतील. तसंच 70 वर्षांपर्यंतच्या सर्व वृद्धांनाही यात समाविष्ट करता येऊ शकतं. सरकारने यंदा सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये यासाठीची तरतूद वाढवली होती.

4. हेल्थ सेक्टरसाठी जास्त सवलती
अर्थमंत्री या बजेटमध्ये हेल्थ सेक्टरला जास्त सवलती देण्याची शक्यता आहे. रिसर्चला गती मिळावी व हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी सरकारने थोडं मोठं मन दाखवायला हवं, अशी मागणी हेल्थ सेक्टरकडून होत आहे. कारण यामुळे सर्वसामान्यांना रुग्णालयात जाणं सोपं होईल व त्यांना चांगले उपचार मिळतील. गेल्या वर्षी बजेटमध्ये हेल्थ सेक्टरसाठी 86,175 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 16 टक्क्यांनी जास्त आहे. या वेळी बजेटमध्ये जास्त पैसे मिळतील, अशी आशा हेल्थ सेक्टरला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.