Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

44 प्रवाशानी भरलेली ' शिवशाही ' बस जळून खाक,अकोल्यात मोठा अपघात

44 प्रवाशानी भरलेली ' शिवशाही ' बस जळून खाक,अकोल्यात मोठा अपघात 


एकीकडे महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हाहाकार पसरला आहे. तर दुसरीकडे एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. 44 प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक आग लागली. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. शेगाववरुन अकोल्याला निघालेल्या शिवशाही बसमध्ये ही मोठी दुर्घटना घडली.

महामार्ग क्रमांक सहावर तुषार हॉटेलजवळ शिवशाही भीषणने पेट घेतला. या आगीत बस जाळून खाक झाली. या बसमध्ये 44 प्रवासी होते, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. चालक गाडी चालवत असताना अचानक जळल्याचा वास आला. त्याने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. तातडीनं सर्व प्रवाशांना बाहेर काढलं.
 
पाहता पाहता बसमध्ये आग लागली आहे. आगीनं रौद्र रुप काही क्षणात धारण केलं आणि संपूर्ण सीट जळून खाक झाल्या. चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या टँकर मधील सिलेंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनीही मदत केली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब लागले, मात्र आगीवर नियंत्रण न मिळवता आल्याने शिवशाही बस जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र बस जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे. ही शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज सांगितल्या जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.