Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' या ' 3 सवयी असणारी मुलं मोठेपणी अतिशय बुद्धिमान होतात

' या ' 3 सवयी असणारी मुलं मोठेपणी अतिशय बुद्धिमान होतात 


बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण आपल्याकडे खूप प्रचलित आहेत. सगळ्या म्हणी अनुभवांतून आलेल्या आहेत. त्यामुळे या म्हणीमध्येही खूप मोठा अर्थ दडला आहे. आपल्या मुलांमधल्या सुप्त कलांगुणांची, त्यांच्या बुद्धीमत्तेची झलक आपल्याला कधी ना कधी दिसत असतेच. पण बऱ्याचदा आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकतो . किंवा मग आपण ते गुण ओळखण्यात थोडे कमी पडतो. त्यामुळे मग मुलांना योग्य दिशा देताना आपली गल्लत होते. 

काही अभ्यासकांच्या मते बुद्धिमान मुलांच्या खेळण्याच्या, वागण्याच्या सवयी इतर मुलांपेक्षा बऱ्याच वेगळ्या असतात. त्यामुळे बुद्धिमान मुलं लगेच ओळखता येतात. मुलांची चाणाक्ष बुद्धिमत्ता हेरणाऱ्या या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहा आणि तुमच्या मुलांमध्येही अशा सवयी दिसून येतात का ते तपासा..

बुद्धिमान मुलांच्या सवयी कोणत्या याविषयी डॉ. देवमिता दत्ता यांनी सांगितलेली माहिती न्यूज एटीनने प्रकाशित केली आहे. त्यानुसार बुद्धिमान मुलांच्या अशा अनेक सवयी असतात, ज्यामुळे खरंतर पालक वैतागून जातात. त्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहा..
१. कितीदा सांगूनही मुलं एका जागी स्वस्थ बसत नसतील, प्रत्येक गोष्टीला हात लावून बघण्याची तसेच कधी कधी तर एखादी वस्तू फोडून तिच्या आत काय आहे हे बघण्याची कुतूहलता असणे.


२. एखाद्या खेळण्यात मुलं एवढी दंग होऊन जातात की तुम्ही कितीदा आवाज देऊनही त्यांचं तुमच्याकडे लक्ष नसतं. अशावेळी पालकांना मुलं आपलं ऐकत नाहीत, आपल्याकडे दुर्लक्ष करतात असं वाटतं आणि ते त्यांना रागवतात. यातून मुलांची एकाग्रता दिसून येते.

३. मुलं तुम्हाला वारंवार प्रश्न विचारत असतील, तुम्ही एखादी गोष्ट सांगितल्यावर का, कुठे, केव्हा असे प्रश्न विचारत असतील तर यावरून त्यांची एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान घेण्याची उत्सूकता दिसून येते. त्यांना प्रश्न पडतात, हे त्यांच्या बुद्धीमत्तेचं लक्षण आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.