Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे, 200 मिमी पाऊस पडणार, हवामान विभागानं दिला इशारा

मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे, 200 मिमी पाऊस पडणार, हवामान विभागानं दिला इशारा

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे आहेत. हवामान विभागानं  दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 36 तासात मुंबईत 200 मिमी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. अंधेरी सबवे खाली 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळं अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. मागील अर्धा तासापासून पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात देखील झालीय. याचा वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अंधेर सबवे खाली तीन चार फुट पाणी साचलं आहे. त्यामुळं तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज मुंबईसह ठाणे आणि पालघरला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील इतर भागातही पडणार जोरदार पाऊस

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

येत्या 72 तासात देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

येत्या 72 तासात देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 13 ते 15 जुलै दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, सिक्कीम, बिहारमध्ये पाऊस पडू शकतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.