Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागासाठी जम्बो भरती :, ' या ' दिवशी सुरु होणार अर्ज प्रक्रिया!

भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागासाठी जम्बो भरती :, ' या ' दिवशी सुरु होणार अर्ज प्रक्रिया!


दहावी पास उमेदवारांना पोस्टामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट खात्याकडून तब्बल 35 हजार 'ग्रामीण डाक सेवक' पदाच्या जम्बो भरतीची माहिती देण्यात आली आहे. १५ जुलै २०२४ रोजी याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. जे उमेदवार पोस्टाच्या परीक्षेसाठी तयारी करत आहे. त्यांच्यासाठी मोठी संधी असणार आहे. 'ग्रामीण डाक सेवक' पदाची पात्रता पूर्ण करणारे उमेदवार १५ जुलै अधिकृत अधिसूचना जारी झाल्यांनतर तात्काळ अर्ज करू शकणार आहे.

कोण अर्ज करू शकतो?
भारतीय पोस्ट खात्यातील 'ग्रामीण डाक सेवक' (GDS) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याने/तिने दहावी परीक्षेत आपल्या मातृभाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. दरम्यान, पोस्ट खात्यातील 'ग्रामीण डाक सेवक' (GDS) पदांसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळणार आहे.
काय आहे शेवटची मुदत?

भारतीय पोस्ट खात्याकडून 'ग्रामीण डाक सेवक' (GDS) पदांसाठी अद्याप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. याबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, 'ग्रामीण डाक सेवक' पदांसाठीची अर्जप्रक्रिया ही १५ जुलैपासून सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज करण्याची अंतिम तारीख ऑगस्टमध्ये असू शकते. या भरतीद्वारे पोस्ट खात्यात एकूण 35 हजार पदे भरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कशी होईल निवड?
भारतीय पोस्ट खात्याच्या 'ग्रामीण डाक सेवक' (GDS) पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. उमेदवारांना 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांच्या निवड होईल. ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर 'डीवा राउंड' पार पडल्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड होईल.
किती पगार मिळेल?

'ग्रामीण डाक सेवक' (GDS) पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना पदानुसार वेतन मिळेल. एबीपीएम/जीडीएस पोस्टचा पगार दरमहा 12 हजार ते 24 हजार रुपये इतका असेल. तर बीपीएम पदांचा पगार 12 हजार रुपये ते 29 हजार रुपये प्रति महिना इतका असणार आहे.

किती असेल परीक्षा शुल्क?
निवड झाल्यानंतर प्रत्येक मंडळाची गुणवत्ता यादीही स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल. भारतीय पोस्ट खात्यात 'ग्रामीण डाक सेवक' पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित श्रेणी आणि पीएच श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय पोस्ट खात्याच्या indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.