Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पिंपरी चिंचवडमध्ये कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार, 30 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवडमध्ये कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार, 30 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरा जवळील उच्चभ्रू परिसर असलेल्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. एका तरुणाने भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत त्याने कुत्रीवर अत्याचार केले. तिथे असलेल्या वॉचमनला हा प्रकार आढळून येताच पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाकडमधील माय होम कन्स्ट्रक्शन साइटवर एका कुत्रीला ३० वर्षीय तरुण अंधाऱ्या भागात घेऊन गेला. तिथे त्याने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केले. या प्रकरणी वॉचमनने चिरंजित निशीकांत बिस्वास याच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. पोलोसिांनी चिरंजित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिरंजीत बिस्वास नावाच्या तरुणाने बांधकामाच्या साइटवरती एका फिरस्त्या कुत्री वरती अनैसर्गिक अत्याचार केलेत. चिरंजीत विश्वास हा पश्चिम बंगालचा रहिवाशी असून तो एका बांधकाम साईटवरती या कुत्री सोबत नैसर्गिक अत्याचार करताना आढळला. वॉचमनने तात्काळ यासंदर्भात हिंजवडी पोलिसात याची माहिती दिली. फिर्यादीनुसार या आरोपीवरती हिंजवडी पोलिसान प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम ११( १) नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. यासंदर्भातची अधिक कारवाई हिंजवडी पोलीस करत आहेत. दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर पिंपरी चिंचवड शहरातील प्राणीप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केलाय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.