पुण्यात गस्त घालणाऱ्या (मार्शल ड्युटी) दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिली. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु आहेत. हा अपघात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात असलेल्या हॅरीस पुलाखालील हा अंडरपास जवळ मध्य रात्री दोनच्या सुमारास झाला. अपघातानंतर कार चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे दोघे मध्यरात्री बीट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत होते. दुचाकीवरून गस्त घालण्यासाठी निघाले असता त्यांना समोरून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने भीषण धडक दिली. यात समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान, पोलीस आयुक्त अमितश कुमार यांनी रुबी हॉल रुग्णालयात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फरासखाना वाहतूक विभागातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस भीतीच्या छायेत असल्याचे पहायला मिळत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.