आज दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वा. धरणामध्ये एकूण ७५.२६ टीएमसी ७१.५१ % पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी *आज संध्याकाळी ४:०० वा. धरणाची वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १०००० क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार* असून येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.
धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ११०५० क्युसेक्स असेल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.