Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वारणा धरणात 23.54 टी.एम.सी. पाणीसाठा वारणा धरणात 23.54 टी.एम.सी. पाणीसाठाआयर्विन पूल सांगली 14.9 (40) व अंकली पूल हरिपूर 18.11 (45.11).

वारणा धरणात 23.54 टी.एम.सी. पाणी साठाआयर्विन पूल सांगली 14.9 (40) व अंकली पूल हरिपूर 18.11 (45.11).


सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 23.54 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 50.77 (105.25), धोम 5.73 (13.50), कन्हेर 4.61 (10.10), वारणा 23.54 (34.40), दूधगंगा 13.95 (25.40), राधानगरी 6.08 (8.36), तुळशी 2.25 (3.47), कासारी 1.96 (2.77), पाटगांव 3.06 (3.72), धोम बलकवडी 1.36 (4.08), उरमोडी 3.07 (9.97), तारळी 2.74 (5.85), अलमट्टी  97.42 (123).

कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 1 हजार 396 क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून 65 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी  व  कंसात इशारा पातळी  फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 14.9 (40) व अंकली पूल हरिपूर 18.11 (45.11).


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.