200 मृत रुग्णानां जिवंत दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचा आमदार जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप, 5 जुलैला सुनावणी
मायणी येथील इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयातील कोरोना काळातील कोट्यावधीचा भ्रष्टाचाराचा आराेप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर लावण्यात आला आहे. त्याबाबतची सुनावणी 5 जुलैला उच्च न्यायालयात हाेणार आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणात आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयित आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी अशी मागणी याचिकेतून देशमुख यांनी केली आहे. त्याबाबतची सुनावणी येत्या 5 जूलैला उच्च न्यायालयात हाेणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.