Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

2 वर्षीय मुलीला फिरायला घेऊन गेला बाप; कधी परतलाच नाही, आई वाट पाहात होती अन्..

2 वर्षीय मुलीला फिरायला घेऊन गेला बाप; कधी परतलाच नाही, आई वाट पाहात होती अन्..

नवी दिल्ली : आई आपल्या मुलांपासून कधीही विभक्त किंवा वेगळं होऊ शकत नाही. त्यांना वेगळं करण्याचा कोणी प्रयत्नही केला तरी आई कोणत्याही थराला जाऊ शकते. पण जेव्हा मुलाचा बापच आपल्या बायकोची फसवणूक करतो, तेव्हा आईने काय करावं?

असाच एक विचित्र अनुभव एका महिलेनं सांगितला, ज्यामुळे ती खचून गेली. एका वडिलांनी आपल्या 2 वर्षाच्या मुलीला परदेशात सहलीला नेलं. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. आई वर्षानुवर्षे आपल्या मुलीची वाट पाहत राहिली. पण आपल्या मुलीला परत मिळवण्यासाठी आईला 17 वर्षे लागली.

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, आयर्लंडमधील कॉर्क येथील व्हिक्टोरिया ओ'लियरीने सौदी अरेबियाच्या व्यक्तीशी लग्न केलं आणि त्यांना मुलगी झाली. दोघेही कॉर्क (आयर्लंड) येथे राहत असत. जेव्हा मुलगी 2 वर्षांची झाली तेव्हा पतीने सांगितलं, की त्याला मुलीला घेऊन एकदा सौदी अरेबियाला जायचं आहे. यानंतर तो आपल्या मुलीला घेऊन निघून गेला. काही दिवसात परतणार असल्याचं त्यानी सांगितलं होतं. पण असं झालं नाही.

आपल्या मुलगी परत मिळवण्यासाठी आईला कायदेशीर लढाई लढावी लागली आणि आता काही आठवड्यांपूर्वी 17 वर्षांनंतर आई आणि मुलगी पुन्हा भेटल्या. 19 वर्षांची फातिमा 2007 मध्ये 2 वर्षांची होती. जेव्हा तिचे वडील तिला आपल्यासोबत सौदी अरेबियात घेऊन गेले होते. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी परतण्यास नकार दिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही फातिमाला परत करण्यास नकार दिला. व्हिक्टोरिया गेल्या 17 वर्षात अनेकवेळा सौदी अरेबियाला गेली, आयर्लंड आणि सौदी अरेबियाच्या सरकारांमध्ये चर्चाही झाली, पण त्यातूनही काही विशेष निष्पन्न झालं नाही. पण व्हिक्टोरियाने प्रयत्न सोडले नाही.

17 वर्षांच्या काळात व्हिक्टोरिया फातिमाशी व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून संपर्कात राहिली आणि गरजेच्या वेळी तिला पैसे पाठवत राहिली. 2023 साली फातिमा 18 वर्षांची झाल्यावर दोघींनाही अचानक आशेचा किरण दिसला आणि तिने स्वत:ची सुटका करण्यासाठी कायद्याचा आधार घेतला. व्हिक्टोरिया आपल्या मुलीला घेण्यासाठी सौदी अरेबियाला पोहोचली आणि हॉटेलमध्ये तिला भेटली. दोघींनी एकमेकींना मिठी मारली आणि त्यांचे अश्रू वाहू लागले. आई तिच्या मुलीला घेऊन घरी गेली, जिथे मुलीच्या आजी-आजोबांनी तिचं स्वागत केलं


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.