Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक परीक्षा, 2 निकाल, पहिला निकाल रद्द तर दुसऱ्यात वेगळाच उमेदवार; MPSCला नोटीस

एक परीक्षा, 2 निकाल, पहिला निकाल रद्द तर दुसऱ्यात वेगळाच उमेदवार; MPSCला नोटीस

छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षांचा घोळ सातत्याने समोर येत आहे. त्यात नुकत्याच झालेल्या तालुका क्रीडा अधिकारी परीक्षेत लावलेल्या निकालाबाबत औरंगाबाद खंडपीठातील मॅट न्यायालयाने नोटीस बजावली आहे. दोन जाहिरात, एक परीक्षा आणि दोन निकाल लावण्यात आला असून त्यात मोठी तफावत असल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. पहिला निकाल लावल्यानंतर तो रद्द करून दुसरा निकाल लावण्यात आला. त्यात तब्बल सोळा परीक्षार्थी खेळाडूंना वगळण्यात आले. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय.

मागील वर्षी तालुका क्रीडा अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेतली. त्यासाठी १५ जागांसाठी पहिली जाहिरात २९ जुलै २०२२ रोजी काढण्यात आली. त्यासाठी अनेक खेळाडूंनी अर्ज केला, मात्र परीक्षा झालीच नाही. तब्बल दहा महिन्यांनी १६ जागांसाठी दुसरी जाहिरात १९ मे २०२३ रोजी काढण्यात आली. त्यावेळी पुन्हा खेळाडूंनी अर्ज केले. दोन्ही जाहिरातींची एकच परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल लावण्यात आला.

जवळपास ८० खेळाडू पुढच्या फेरीसाठी निवडण्यात आले. मात्र काही दिवसात एक परिपत्रक काढून निकाल स्थगित करण्यात येत असल्याचं नमूद केलं. दुसरा निकाल जाहीर केला त्यावेळी १७ उमेदवारांची नावे वगळण्यात आले. ही नावे का वगळले या बाबत कुठलीच माहिती देण्यात आली नाही. प्रशासकीय कारणाने निकालात स्थगिती दिली अस सांगण्यात आले. मात्र नेमकं कारण नसल्याने न्यायालयात गेल्याच तक्रारदार क्रिकेटपटू आणि कराटे प्रशिक्षक सोनम तांदळे आणि छत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे यांनी सांगितले.

पहिल्या लागलेल्या निकालात उत्तीर्ण असलेल्या 17 खेळाडूंचे नाव दुसऱ्या निकालात वगळण्यात आले. त्यात क्रिकेटपटू आणि कराटे खेळात अनेक पदक मिळवणारी खेळाडू सोनम तांदळे आणि तलवार बाजी खेळत अनेक पदक जिंकलेल्या छत्रपती पुरस्कार प्राप्त सागर मगरे या दोन खेळाडूंचा समावेश आहे. खेळात प्रावीण्य मिळवल्यानंतर परीक्षांची तयारी करून अचानक निकाल बदलल्याने दोन्ही खेळाडूंनी खंडपीठात मॅट न्यायालयात धाव घेतली. त्यांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरण्यात आले. प्रशासकीय तांत्रिक चूक म्हणजे काय असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरून निकाल बदलण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थितीत करत खंडपीठाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते वकील महेश मुठाळ यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.