विटा : विट्यामधील विशाल पाटील टोळीला सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक मेमाणे म्हणाले, विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळीला सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता हद्दपार करण्याचा आदेश पारीत केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभुमीवर ही तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.
टोळी प्रमुख विट्यातील विशाल प्रशांत पाटील (वय २४, रा. शाहु नगर) अमरजित अनिल क्षिरसाग र, (वय २२, रा.पाटील वस्ती) अमृत राजेंद्र काळोखे(वय २४, रा. विवेकानंदनगर) शुभम महेश कोळी (वय २५, रा. कदमवाडा) किसन राजेंद्र काळोखे (वय ३०) विजय राजेंद्र काळोखे, वय २४) सागर देवेंद्र गायकवाड (वय २७, रा. तिघेही विवेकानंदनगर) या टोळीविरुद्ध सन २०१९ ते २०२३ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न करणे, बिगरपरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत माजवणे, अपहरण करणे, बांधकाम साहित्याची तसेच मोटारसायकल आणि इतर चोऱ्या करणे असे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे यांचेकडे चौकशी केली. त्यानुसार या सर्वांना तडीपार करण्यात आले आहे. दरम्यान, टोळीने गुन्हे करणा-या लोकां वर बारकाईने नजर ठेऊन त्या नेस्तनाभूत करू असेही पोलीस निरीक्षक मेमाणे यांनी सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.