Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासदार विशाल पाटील लोकसभेत अर्थमंत्री यांच्यावर बरसले :, म्हणाले, " निदान 17 खासदारांना तरी "....

खासदार विशाल पाटील लोकसभेत अर्थमंत्री यांच्यावर बरसले :, म्हणाले, " निदान 17 खासदारांना तरी "....
 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला बजेटवर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चेत काँग्रेसचे खासदार विशाल पाटलांनी  बजेटवरून अर्थमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला होता. आम्हाला विसरा पण तुमच्या 17 खासदारांना पाहून तरी महाराष्ट्राला बजेटमध्ये काही द्यायचं, असा टोला देखील विशाल पाटलांनी निर्मला सीतारामण यांना लगावला आहे.

लोकसभेत बजेटच्या चर्चेवर बोलताना विशाल पाटील म्हणाले की,''सांगलीला या बजेटमधून काहीतरी मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण सांगली तर दुरच राहिला दीड तासाच्या भाषणात महाराष्ट्राचं नाव देखील घेण्यात आलं नाही, अशी खंत विशाल पाटलांनी व्यक्ती केली.

आसाम आणि बिहारमध्ये आलेल्या पुरावर चर्चा झाली. पण महाराष्ट्रात होणाऱ्य पुराच्या नुकसानीवर अर्थमंत्र्या बोलल्या देखील नाही, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.तसेच आंध्रप्रदेशच्या अमरावतीला हजार कोटीचा निधी देण्यात आला.पण महाराष्ट्रात देखील एक अमरावती येते त्याचा उल्लेखच केला नाही,अशी टीका विशाल पाटलांनी सीतारामण यांच्यावर केली.
विशाल पाटील पुढे म्हणाले की, ''बिहारच्या सिंचन योजनेसाठी एबीपी आणि पीफकेएसवायसे निधी देण्याबदद्ल बोललं गेलं. पण सांगलीत विस्तारीत म्हैसाळ, विस्तारीत टेंभू प्रकल्पासाठी एबीपीमधून निधी देण्याची गरज वाटली नाही,असा हल्लाही त्यांनी अर्थमंत्र्यांवर चढवला.

भारताच्या टॅक्सचा 37 टक्के हिस्सा हा महाराष्ट्रातून येतो. भारताच्या जीडीपीचा 14 टक्के हिंसा महाराष्ट्र देतो. सरकारचं 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष आहे.पण महाराष्ट्राच्या विकासाशिवाय भारताचा विकास होणार नाही आहे, असे विशाल पाटलांनी ठणकावून सांगितले. तसेच यावेळी विशाल पाटलांनी महाराष्ट्राचं राज्य गाण देखील गायलं.''दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा...असे म्हणत, दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे,आणि यापूढेही घेत राहिलं. मग ती आर्थिक,सामाजिक, साहित्यिक राजकीय असो,असे विशाल पाटील यांनी सांगितले.

एनडीए सरकारला महाराष्ट्राने 17 खासदार दिले आहेत. आम्हाला विसरा जा पण त्या 17 खासदारांना पाहून तरी महाराष्ट्राला काही द्यायचं, असा टोला देखील विशाल पाटलांनी निर्मला सीतारामण यांना लगावला आहे.आता या 17खासदारांना भीती आहे. पुन्हा मतदार संघात जाऊन काय सांगणार? हे दुख या खासदारांना सतावत असल्याची टीकाही विशाल पाटलांनी एनडीएच्या खासदारांवर केली. विशाल पाटलांनी यावेळी तुकाराम महाराजांचा अभंग देखील ऐकवला. ''बोलाचीच कडी, बोलाचाच भात, खाऊनीया तृप्त कोण झाला..असे बोलून कुणाच पोट भरत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.