Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

17 लाखाचे घड्याळ, 7 फ्लॅट, अजून काय - काय? IAS पूजा खेडकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती उघड

17 लाखाचे घड्याळ, 7 फ्लॅट, अजून काय - काय? IAS पूजा खेडकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती उघड 


आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांची नियुक्ती सध्या वादाचा विषय ठरली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर आणली आहे. पूजा खेडकर या IAS कशा झाल्या यावरुनच वाद आहे.
प्रोबेशनर असताना ऑडी गाडीतून येणं, दुसऱ्यांची केबिन बळकावणं, अधिकाऱ्यांना त्रास देणं या वर्तनामुळे डॉ. पूजा खेडकर नजरेत आल्या. जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट मुख्य सचिवांना पाठवल्यानंतर आता पूजा खेडकर यांची वाशीमला बदली झाली आहे.

आता डॉ. पूजा खेडकर यांच्या संपत्तीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी डॉ. पूजा खेडकर यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांकडे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र असून 110 एकर शेतजमीन आहे. ही मालमत्ता म्हणजे शेतजमीन कमाल मर्यादा कायद्याचे उल्लंघन आहे, असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे.
याची चौकशी व्हायला नको का?

1.6 लाख चौरस फुटाची 6 दुकान आहेत. 7 फ्लॅट असून यात हिरानंदानी या पॉश वस्तीत एक फ्लॅट आहे. 900 ग्रॅम सोने, हिरे, 17 लाख रुपये किंमतीच सोन्याचं घड्याळ आहे. 4 कार, दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी आणि एक ऑटोमोबाईल कंपनी आहे. स्वत: पूजाकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याची चौकशी व्हायला नको का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विचारला आहे.

अधिकारांची घाई झाल्याने चर्चेत
IAS च्या ट्रेनी अधिकारीसाठी काही नियम असतात. त्याच पालन होत नसल्याने पूजा खेडकर नजरेत आल्या. मागच्या दोन महिन्यांपासून विविध विशेषाधिकारांची त्या मागणी करत होत्या. त्यांच्याकडे स्वत:ची खासगी ऑडी कार आहे. त्यासाठी लाल-निळा दिवा, लेटर पॅड, नेमप्लेट, स्वतंत्र ऑफिस चेंबर आणि स्टाफची मागणी पूजा खेडकर यांनी केली होती. पूजा खेडकर यांना अद्याप हे विशेषाधिकार मिळालेले नाहीत, पण तरीही त्या सतत या मागण्या करत होत्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.