मुंबई : रस्त्यावर आपल्याला वाहनाने प्रवास करत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अतिशय गरजेचे असते. तसेच वाहन चालवताना वैध वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासते. आपल्याला माहित आहे की अवजड वाहनांपासून तर चारचाकी आणि दुचाकी चालवण्यासाठी भारतात ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे.
या ड्रायव्हिंग लायसन्सच्या संदर्भात देखील काही महत्त्वाचे नियम असून त्या नियमांच्या आधारे आपल्याला सगळ्या गोष्टींचे पालन करावे लागते. महत्वाचे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा ड्रायव्हिंगच्या असलेल्या नियमांमध्ये नुकतेच काही बदल करण्यात आलेले आहेत व आता केवळ अठरा वर्षाच्या तरुणांनाच नाही तर सोळा वर्षाच्या तरुणांना देखील ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे. परंतु यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी देखील असणार आहेत.
ड्रायव्हिंग लायसनच्या किंवा ड्रायव्हिंगच्या नियमांमध्ये जे काही नुकतेच बदल करण्यात आले त्यानुसार आता केवळ अठरा वर्षाच्या तरुणांनाच नाहीतर सोळा वर्षाच्या तरुणांना देखील ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार आहे. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की या ड्रायव्हिंग लायसन्समुळे सोळा वर्षाच्या तरुणांना फक्त दुचाकीच चालवता येणार आहे.या ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे अशा सोळा वर्षाच्या तरुणांना स्कूटर, मोटरसायकल किंवा इतर तत्सम वाहने चालवता येणे शक्य होणार आहे. या निर्णयाचा फायदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे आता तरुणांना मोटरसायकल सारखी छोटी वाहने चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करता येणार आहे. फक्त यामध्ये संबंधित वाहन हे 50 सीसी पेक्षा कमी आहे आणि 70 किलोमीटर प्रतितास पेक्षा जास्त वेगाने ते जात नाही इत्यादी गोष्टींकडे यामध्ये लक्ष दिले जाणार आहे.तसेच सोळा ते अठरा वर्षाच्या मुलांकरिता संबंधित वाहनाच्या इंजिनची शक्ती 4.0 किलोवॅट पर्यंत मर्यादित असावी. त्यामुळे मुलांना फक्त रस्त्यावर इलेक्ट्रिक आणि इको फ्रेंडली बाईक्स आणि स्कूटर वापरायला प्रोत्साहन मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांना फायदा होण्यासोबतच ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांवर विशेष सकारात्मक परिणाम होणार आहे.
लहान शहरांमध्ये व्यक्तींना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. परंतु आता या नवीन नियमामुळे या क्षेत्रातील किशोरवयीन मुलांसाठी हे सोपे होणार आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या य तरुण मुलांना या धोरणातील बदलाचा अधिक फायदा होईल असे बोलले जात आहे. ड्रायव्हिंग लायसन्सची अट रद्द करण्यात आल्याने वाहतूक पोलीस त्यांना आता दंड करू शकणार नाहीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.