जबरदस्त! सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकदोन नव्हे, 13 भत्त्यांत वाढ
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव पुढे करण्यात आल्याची चर्चा असतानाच कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचं वृत्त समोर आलं आणि अनेकांच्याच चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. केंद्र शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या विविध विभागांमध्ये सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन, त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा आणि सवलती यांचा अनेकांनाच हेवा वाटतो आणि आता त्यात आणखी भर पडणार आहे. कारण, सरकारच्या एका निर्णयानंया कर्मचाऱ्यांचा फायदाच फायदा होताना दिसत आहे.
सरकारच्या वतीनं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेनुसार महागाई भत्ता 50 टक्क्यांच्याही पलिकडे पोहोचल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकदोन नव्हे, तब्बल 13 भत्त्यांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ होत आहे. मार्च महिन्यातच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. ज्यामुळं त्यांचा DA 50 टक्क्यांवर पोहोचला.
यादरम्यान वाढच्या दरांचा परिणाम कमी करण्यासाठी म्हणून सरकारनं निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अर्थात डीआर 4 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांवर आणला आहे. ज्यामुळं सरकारी कर्मचाठऱ्यांचं वेतन आणि त्यांच्या निवृत्तीवेचनाच्या आकडेवारीत भर पडली आहे.
कोणाला होणार फायदा?
टफ लोकेशन म्हणजेच दुर्गम भागांमध्ये सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ होणार असून, याअंतर्गत मिळणाऱ्या भत्त्यांची विभागणी 3 भागांमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय वाहन DA 50% पोहोचल्यामुळं आता इतर भत्त्यांमध्येही वाढ होणार असून, यामध्ये हाउस रेंट अलाउंस (HRA)चा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार 01-01-2024 पासूनच्या निम्नलिखित भत्त्यांची रक्कम कर्मचाऱ्यांना 25 टक्के वाढीव दरानं देण्यात येऊ शकते असं स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मिळणारा विशेष भत्ता, पाल्यांना मिळणारा भत्ता, शिक्षण भत्ता, घरभाडं भत्ता, गणवेश भत्ता, ड्यूटी भत्ता, डेप्युटेशन भत्ता, वाहन भत्ता अशा भत्त्यांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.