लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गोंडामधे एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरल्याचं वृत्त आहे. चंदिगड-डिब्रूगड एक्स्प्रेसला हा अपघात घडला आहे. ही रेल्वे चंदिगडवरून गोरखपूरला निघाली होती. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
चंदीगढवरुन निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनचे गोंडा मनकापूर स्टेशनजवळ डब्बे रुळावरुन घसरल्याचं समोर आले आहे. डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालं. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झालेय. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात अद्याप मृतांची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. पण गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये चनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून या अपघात प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वे अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. गोरखपूर रेल्वे सेक्शनच्या मोतीगंज सीमेजवळ जिलाही दरम्यान एक्स्प्रेस रेल्वेचा हा अपघात झाला.
सीएम योगी आदित्यनाथ यांच्याकडून मदतकार्य करण्याचे निर्देश
दिब्रूगड एक्स्प्रेसच्या अपघाताची माहिती मिळताच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्यासोबत याबाबत चर्चा केली. त्यासोबतच अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सीएचसी, प्राथमिक आरोग्य केंद्रांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. एसडीआरएफच्या टीमलाही घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.