Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंबरनाथ :- 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 1 का मुलीसह 6 जणांना अटक

अंबरनाथ :- 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 1 का मुलीसह 6 जणांना अटक 


अंबरनाथमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिमच्या खडी मशीन परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ३ अल्पवयीन मुलांचा आणि एका मुलीचा समावेश आहे. या घटनेमुळे अंबरनाथ हादरले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी अंबीवलीमध्ये राहणारी ११ वर्षांची मुलगी आपल्या आजीसोबत अंबरनाथमध्ये आली होती. यावेळी रस्त्यावरून जात असताना मुलगी आजीचा हात सोडून निघून गेली. दिवसभर ती अंबरनाथमध्ये इकडे तिकडे फिरली. त्यानंतर या मुलीला १३ वर्षांची मुलगी भेटली. ही मुलगी पीडित मुलीला अंबरनाथच्या खडी मशिन परिसरात घेऊन गेली. याठिकाणी एका मुलाने या मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार केला.
पीडित मुलीच्या वडिलांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यामध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या मुलीचा शोध घेतला असता ती अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आढळून आली. या मुलीची विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये ४ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर इतर दोघे तरुण आहेत. 'याप्रकरणाचा तपास सुरू आहे. मुलीवर एकाच मुलाने बलात्कार केला आहे. त्यावेळी घटनास्थळी इतर जण उपस्थित होते त्यामुळे त्यांना देखील आरोपी करण्यात आले आहे.', अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. शहाराध्यक्ष सदा मामा पाटील यांनी अंबरनाथ पोलिसांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणातील आरोपींविरोधात कारवाई व्हावी आणि पीडित मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली. ही घटना १२ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी १३ जुलै रोजी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडले असून त्याआधारे ते तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.